Shivsena resignation : निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्यानी दिला राजीनामा

Thane municipal election News : शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे शिवसेना महिला आघाडी प्रमुखांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच एका बड्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे शिवसेना महिला आघाडी प्रमुखांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

ठाण्यातील शिवसेना (Shivsena) महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Pune BJP : पुण्यात भाजप आमदारांनी उघडले उमेदवारांचे पत्ते : जम्बो प्रवेशानंतर नव्या-जुन्यांची धडधड वाढली

काही दिवसापूर्वीच पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी प्रभाग क्रमांक तीनमधील मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. ही हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य रंगले आहे. यावरुनच शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

Eknath Shinde
Shivsena UBT : 'भाजपला 'अखंड महाराष्ट्र' कल्पनाच मान्य नाही, लुटीतला वाटा टाका आणि मुंबईचा लिलाव...;' ठाकरेंच्या युतीनंतर सामनातून हल्लाबोल

ठाणे पालिकेतील माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केले होते. त्यामध्ये विक्रांत वायचळ यांचा समावेश होता. विक्रांत वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिवसेनेतून वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज होत्या अशी माहिती समोर येत आहे. ऐन पालिका निवडणुकीत नाराज मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Eknath Shinde
Congress-NCP Alliance: काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल! पण 'या' अटी पूर्ण झाल्या तरच अजित पवारांसोबत करणार आघाडी

शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

2017 सालच्या महापालिका निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेने ठाण्यात 131 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी मिनाक्षी शिंदे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्या शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात. आता त्यांच्याच राजीनाम्यानंतर ठाण्यातील शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे येत्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Shivsena UBT : 'भाजपला 'अखंड महाराष्ट्र' कल्पनाच मान्य नाही, लुटीतला वाटा टाका आणि मुंबईचा लिलाव...;' ठाकरेंच्या युतीनंतर सामनातून हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com