Shivsena News :'...तर मी केंद्रात मंत्री राहिले असते!'; 5 टर्म खासदार राहिलेल्या महिला नेत्याची खदखद

Political News : यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे पाच टर्म प्रतिनिधित्व केले आहे. यावेळेस सहाव्यावेळी जर मला संधी मिळाली असती तर मी केंद्रात मंत्री राहिले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Shivsena
Shivsena Sarakrnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीने जागावाटपात ऐनवेळी काही बदल केले. त्याशिवाय एकनाथ शिंदे गटाच्या काही खासदारांच्या विरोधात सर्व्हे असल्याचे सांगत त्यांची उमेदवारी कापली होती. त्यामुळे काही जणांचा भ्रमनिरास झाला होता. विशेषतः यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्याची सल आजही त्यांच्या मनात आहे.

गेल्या पाचवेळा मी निवडून आले आहे. कदाचित यावेळी मी निवडून आली असती तर केंद्रात मंत्री राहिली असते, अशी खदखद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे पाच टर्म प्रतिनिधित्व केले आहे. यावेळेस सहाव्यावेळी जर मला संधी मिळाली असती तर मी केंद्रात मंत्री राहिले असते, अशी खंत भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी व्यक्त केली.

नांदेडमधील कार्यक्रमावेळी बोलताना त्या म्हणाल्या लोकसभेवर संधी मिळाली नसली तरी त्याची भरपाई पक्षाने केली आहे. आता विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रात नाही मिळाले तरी राज्यात तरी मंत्रीपद मिळेल, अशी आशाही यावेळी गवळी यांनी व्यक्त केली.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कट करुन हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेंव्हापासून भावना गवळी नाराज होत्या. मात्र, शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.

Shivsena
MVA Meeting : 'मविआ'च्या बैठकीत चर्चा; मुंबईतील 16 जागांवर तीन पक्षांत तिढा

नांदेड येथील कार्यक्रमात त्यांनी खदखद व्यक्त केली. येत्या काळात मला कुणीही कितीही टार्गेट केले तरी मी थांबणार नाही, मी खंबीरपणे उभी राहणार आहे, असे देखील भावना गवळी म्हणाल्या.

हेमंत पाटील यांना लगावला टोला

विदर्भातील मुली निश्चितच चांगल्या आहेत. पण मराठवाड्यातील जावई मात्र तिकडे येऊन कब्जा करत आहेत, काही हरकत नाही, पण आमचे मन मोठं आहे. आम्ही त्यांची सरबराई करायला तयार आहोत, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी माजी खासदार हेमंत पाटील यांना टोला लगावला.

Shivsena
Washim Assembly Election: वाशिम जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व; मविआ, महायुतीची धाकधूक वाढली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com