Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असतानाच महाविकास आघाडीच्या जागावाटपाला अखेर मुहूर्त लागला आहे. सोमवारी जागावाटपावर चर्चा करण्यात आली.
मुंबईतील जागावाटप संदर्भात सोमवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गट यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झाला नसल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले.
2019 ला महाविकास आघाडीतील पक्षांनी जिंकलेल्या 20 जागा सोडून इतर 16 जागांवर अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात चर्चा सुरू आहे. काही जागांवर तीनही पक्ष तर काही जागांवर दोन पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे अजूनही पुढील बैठकीमध्ये मुंबईतील जागा संदर्भात चर्चा होणार आहे.
शिवसेना ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे. तर त्यातील काही जागांवर काँग्रेस आग्रही आहे. काँग्रेसने 12 ते 14 जागांवर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच ते सात जागांवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे येत्या काळात आणखीन चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम रूप देण्यात येणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत तीन पक्षात चर्चा झाली. यावेळी तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी जागावाटपासॊबतच विविध महत्वपूर्ण विषयासह यावेळी प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली असल्याचे समजते. यावेळी काही जागांवर तीनही पक्ष तर काही जागांवर दोन पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे अजूनही पुढील बैठकीमध्ये मुंबईतील जागा संदर्भात चर्चा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.