Adivasi Students Agitation: आंदोलक विद्यार्थ्यांचा अखेर विजय! सर्व मागण्या मान्य, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती; विद्यार्थ्यांनी मानले राहुल गांधींचे आभार

Adivasi Students Agitation: गेल्या १७ दिवसांपासून पुण्यातील मांजरी इथल्या वसतीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे.
Adivasi Vikam Mantri Ashok
Adivasi Vikam Mantri Ashok
Published on
Updated on

Adivasi Students Agitation: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासांठी गेल्या १७ दिवसांपासून मांजरी येथील वसतीगृहाच्या परिसरात या विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु होतं. या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्षात बैठक पार पडली, या बैठकीत सर्व मागण्या मान्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांनी यासाठी थेट लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी नागपूर, नाशिक आणि पुणे येथील वसतीगृहात उपोषण सुरु केलं होतं. पण आता सरकारनं मागण्या मान्य केल्यानं आज संध्याकाळपर्यंत हे विद्यार्थी आपलं उपोषण मागे घेतील असं सांगितलं जात आहे. खुद्द मंत्री उईके यांनी ही माहिती दिली आहे.

Adivasi Vikam Mantri Ashok
Manda Mhatre Vs Ganes Naik : मंदा म्हात्रेंचा मंत्री नाईकांवर हल्लाबोल : मैदानं विकली, तेव्हा मंत्री म्हणून झोपा काढल्या का? टक्केवारीचाही गंभीर आरोप

उईके यांनी काय सांगितलं?

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, महाराष्ट्रात जे जे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की, पुणे, नाशिक आणि नागपूर इथं सुरु असलेल्या उपोषणातील नागपूर, पुणे इथल्या विद्यार्थ्यांसोबत बैठक पार पडली. आज आम्ही पुण्याला जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांचं उपोषण सोडवणार आहोत.

अतिशय सकारात्मक आणि विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडं मांडल्या त्या संपूर्ण मागण्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर करुन त्यांना अश्वासित केलं की, येणाऱ्या तीन महिन्यांत इथं आपण जे निर्णय घेतले आहेत त्यात काही अडचणी आल्या असतील तर त्याची तपासणी करण्यासाठी, शहानिशा करण्यासाठी पुन्हा एकदा तीन महिन्यांनंतर बैठक घेणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

विदयार्थ्यांची प्रतिक्रिया काय?

बिंदुनामावलीत २०१७ च्या जीआर प्रमाणं जो सध्या पाचव्या क्रमांकावर आहे तो दुसऱ्या क्रमांकावर यावा. २०२४ ला हा जीआर पुढे गेला, या जीआरवर आमची सरकारसोबत चर्चा झाली. त्यानंतर जे काही बोगस उमेदवार आहेत. म्हणजेच ज्यांच्याकडं जात पडताळणी झालेली नाही. परंतू त्यांनी नोकरी मिळवली आहे, पण आपल्याकडं एक कायदा आहे की, जर सहा महिन्यांत पडताळणी जमा केली नाहीतर त्त्यांना काढून टाकण्या यावं. २०१९-२० मधील लोक अद्यापह नोकऱ्या करत आहेत, त्यांना कार्यमुक्त केलेलं नाही. त्यामुळं त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्या. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली ही हे तत्काळ व्हावं. यावर मुख्यमंत्र्यांनी अशा विद्यार्थ्यांना उद्यापासून करायवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोणाचे मानले आभार?

यावेळी विद्यर्थ्यांनी सांगितलं की, काही राज्य आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांनी आमची साथ दिली. विशेष आभार मानायचं म्हटलं की, राहुल गांधीचे आभार मानतो. तसंच एनएसयुआयसारखे काँग्रेसचे कार्यकर्ते, यशोमती ठाकूर तसंच विविध विद्यार्थी संघटना यांनी आमच्यापर्यंत मीडिया पोहोचवला. आदिवासी समाजापर्यंत एवढा मीडिया इतिहासात कधी पोहोचला नसेल, असं आम्हाला वाटतं. असंही या विद्यार्थांनी म्हटलं आहे.

Adivasi Vikam Mantri Ashok
Prashant Shitole Removed : पिंपरी भाजपला प्रदेशाचा ‘झटका’; कोअर कमिटीच बदलली, पक्षनेत्यांची उचलबांगडी, नेमकं कारण काय?

बिंदुनामावलीत २०१७ च्या जीआर प्रमाणं आदिवासी समाज जो सध्या पाचव्या क्रमांकावर आहे तो दुसऱ्या क्रमांकावर यावा. २०२४ ला हा जीआर पुढे गेला होता, या जीआरवर आमची सरकारसोबत चर्चा झाली. त्यानंतर जे काही बोगस उमेदवार आहेत. म्हणजेच ज्यांच्याकडं जात पडताळणी झालेली नाही. परंतू त्यांनी नोकरी मिळवली आहे, पण आपल्याकडं एक कायदा आहे की, जर सहा महिन्यांत पडताळणी जमा केली नाहीतर त्त्यांना काढून टाकण्या यावं. २०१९-२० मधील लोक अद्यापह नोकऱ्या करत आहेत, त्यांना कार्यमुक्त केलेलं नाही. त्यामुळं त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्या. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली ही हे तत्काळ व्हावं. यावर मुख्यमंत्र्यांनी अशा विद्यार्थ्यांना उद्यापासून करायवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com