Pune News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव अखेर पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाच्या रडारवर आला आहे. महापालिकेच्या कामकाजात वारंवार निर्माण होणारा गोंधळ आणि त्यानंतर निर्णय मागे घेण्याची वेळ येत असल्याने भाजपच्या प्रदेश समितीने महापालिकेतील ‘कोअर कमिटी’ची फेररचना केली आहे. या फेररचनेत पक्षनेते प्रशांत शितोळे यांना डच्चू देण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपच्या कोअर कमिटीत १४ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, पक्षाचे प्रभारी भरत पाटील, शहर कार्यकारिणी सरचिटणीस वैशाली खाडये, मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस आणि माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांचा समावेश आहे.
शहर पातळीवर पक्षाचे धोरण ठरवणे, संघटनात्मक निर्णय घेणे तसेच पक्षांतर्गत शिस्तीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी या कमिटीवर आहे. कोअर कमिटीची चर्चा किंवा मान्यता न घेता पदाधिकारी अथवा नगरसेवकांनी कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर किंवा जाहीरपणे प्रतिक्रिया देऊ नये, असा पक्षांतर्गत नियम आहे.
महापालिका कामकाजात पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाणाऱ्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकारही कमिटीला आहेत. तसेच पक्ष आणि संघटनेसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचे अधिकारही कमिटीला आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या मतभेदांची प्रदेशाकडून दखल
महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत गोंधळ आणि पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे सत्ताधारी भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू होती. काही निर्णय घेतल्यानंतर ते मागे घेण्याची वेळ आली होती. त्यानंतर महापौरांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळही पदाधिकाऱ्यांवर आली होती. या पार्श्वभूमीवर प्रदेश समितीने कोअर कमिटीत फेरबदल केल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, शहर विकासाच्या मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे आणि आपल्या वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शहराध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
-सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.