

Navi Mumbai, 28 August : बेलापूर येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी जागा निश्चित केली होती. मात्र ती जागा बदलावी, यासाठी गणेश नाईक गटाने न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल म्हात्रे यांच्या बाजूने लागल्यानंतर त्यांन वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार प्रहार केला. खेळाची मैदानं विकली तेव्हा तुम्ही झोपा काढत होता का, घणसोलीतील मैदान गेलं, तेव्हा तुम्ही काय केलं? असा सवाल आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक यांना विचारला.
आमदार म्हात्रे म्हणाल्या, कोरोना काळात नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटलची मोठी कमतरता जाणवली. त्यावेळीच नवी मुंबईत बेलापूर येथे एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी मी न्यायालयात केस लढत होतो. माझा न्यायदेवतेवर विश्वास होता आणि आज कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला.
बेलापूरच्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला गेली अडीच वर्षे विरोध करण्यात आला. माझं अक्षरश रक्त न रक्त पिलं गेलं. विषाणूप्रमाणे हे सर्व मला झोंबले होते. हॉस्पिटल होऊ नये; म्हणून मला प्रचंड मानसिक त्रास दिला. कालपर्यंत कोर्टात केस होती, परवाच्या सुनावणीलाही त्यांचे वकिल आले नाहीत. तारीख पे तारीख घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, असेही मंदा म्हात्रे यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या, नवी मुंबईतील जनतेला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं, असं वाटत होतं. त्या मार्गात सर्व अडथळे दूर झाल्याने आज माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा क्षण आहे. ही गोरगरिबांची लढाई मी प्रस्थापित लोकांच्या विरोधात जाऊन लढले आणि जिंकले, याचा मला खूप आनंद आणि समाधान आहे.
विरोधाला विरोध करू नये. समोरचा माणूस कितीही छोटा असला तो कधीही मोठा होऊ शकतो आणि तुम्हाला धक्का देऊ शकतो. मी दोन दोनदा धक्के दिले आहेत. त्यानंतरही माणूस सुधारत नसेल तर देव बघून घेईल, काय बघायचं ते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या, मी आणखी तीन प्रोजेक्ट आणले आहेत. बेलापूर, नेरुळ आणि सानपाडा या तीन ठिकाणी ही मैदानं होणार आहेत. ते सतत म्हणतात खेळायला मैदानं नाहीत. खेळायची मैदानं विकली गेली, त्या वेळी तुम्ही काय करत होतात? काय झोपा काढत होता का? मंत्री म्हणून तुम्ही काय करत होता?
तुमचं घणसोलीचं ४० प्लस एवढं मोठं मैदान गेलं. त्यावेळी तुम्ही काय केलं? सगळ्यांनी टक्केवारी घेतली आणि गप्प बसले. आता कामं आणि टक्केवारी मागायला येतील. पण कोण येतंय ते बघू. मीपण बघणार आहे कोण कोण काम मागायला येतं. सगळ्यांनी विरोध केला आणि त्या विरोधाला मी पुरी पडलेली आहे, असेही आमदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.