Nawab Malik Support Ajit Pawar : मोठी बातमी : जामिनावर सुटलेल्या नवाब मलिकांचा अजित पवारांना पाठिंबा ?

NCP Politics गेले दीड वर्षाहून अधिक काळ ते तुरुंगात होते. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. सूत्रांच्या हवाल्याने साम टीव्हीने नुकतेच याबाबत वृत्त प्रसिद्ध केले.

गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांना १४ ऑगस्टला जामीन मिळाला. ५० हजारांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. तेव्हापासून नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिकांनी “मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार असल्याची प्रतिक्रियाही दिली होती.

Nawab Malik
Nawab Malik News : नवाब मलिकांचं अखेर ठरलं : साहेब की दादा ? ; मलिक म्हणाले, "मी...'

दुसरीकडे नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले, त्यासाठी त्यांनी अजित पवारांची भेटही घेतली होती. सना मलिक यांच्या पाठपुराव्यामुळे नवाब मलिक यांनाही लवकरच जामीन मिळण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. अपक्षेप्रमाणे काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांना जामीन मंजूर केला, पण ते कोणासोबत जाणार याबाबत कोणतेही स्पष्टीकरण त्यांनी त्यावेळी दिले नव्हते.

मलिकांच्या सुटकेला आता जवळपास दीड-दोन महिने झाले. नवाब मलिकांना आपल्या गटात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात अद्याप हालचाली सुरू आहेत. मलिकांची अधिकृतपणे पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते काय निर्णय घेणार, याकडे त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Nawab Malik
Nawab Malik News : नवाब मलिकांना दुसरा दिलासा ; हमीदार सादर करण्याची मुदत महिनाभराने वाढवली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com