Patanjali: तुकाराम मुंढेंचा 'पतंजली' आयुर्वेदला दणका! फसव्या जाहिरातींचा 73 लाखांच्या औषधांचा साठा जप्त

Tukaram Mundhe Action on Patanjali: अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यपद्धतीनं प्रमाणं धडाक्यात कामकाजाला सुरुवात केली आहे.
Tukaram Mundhe_Baba Ramdev_Patanjali Divya pharmacy
Tukaram Mundhe_Baba Ramdev_Patanjali Divya pharmacy
Published on
Updated on

Tukaram Mundhe Action on Patanjali: अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यपद्धतीनं प्रमाणं धडाक्यात कामकाजाला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी पदभार स्विकारल्यानंतर लगेचच त्यांनी औषधं, दुध, खाद्यापदार्थ यांच्या भेसळीवर चाप बसवला आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करुन ३३ जणांना अटकेची कारवाईही झाली आहे. पण आज त्यांनी सरकारलाही हादरा बसेल असं काम केलं आहे. त्यांनी थेट बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद उद्योग समुहाच्या दिव्य फार्मसीच्या औषधांवर कारवाई केली आहे. त्यांनी या दिव्य फार्मसीच्या तब्बल ७३ लाख २५ हजार रुपयांच्या फसव्या जाहिराती करुन विकला जाणारा औषधांचा साठा जप्त केला आहे.

Tukaram Mundhe_Baba Ramdev_Patanjali Divya pharmacy
Jarange Vikhe Meeting: विखे गृहपाठ करुन गेले तरीही फेल झाले! मॅरेथॉन चर्चेनंतरही तोडगा नाहीच; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

अन्न व औषध प्रशासनं अर्थात एफडीएनं या कारवाईची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यानुसार, पतंजलीच्या या दिव्य फार्मसीच्या औषधांची जाहिरात ही अत्यंत आक्रमकपणे आणि शंभर टक्के उपचारांची हमी देणाऱ्या असा उल्लेख केलेल्या आहेत. यातील बऱ्याच जाहिरातींमधून दिशाभूल आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचंच प्रतित होतं. कारण या जाहिरातींमध्ये चमत्कारीक उपचार वैगरेंसारखे शब्द वापरलेले आढळतात. या आयुर्वेदिक औषधांची जाहिरात करताना अत्यंत गंभीर स्वरुपाचे आजार जसे की कॅन्सर, डायबेटिस यांच्यावर हमखास उपचार असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे वैज्ञानिक आधार नसलेले चमत्कारीकरित्या बरं करणारे दावे देखील या जाहिरातींमधून करण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe_Baba Ramdev_Patanjali Divya pharmacy
NEET प्रकरणावरुन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार? सुप्रीम कोर्टानं वैयक्तिक जबाबदारीवर केलं मोठं भाष्य

दरम्यान, अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार स्विकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. यानंतर आता पतंजलीच्या औषधांवर कारवाईनंतर एफडीएनं देखील हे स्पष्ट केलं आहे की, औषधं व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० चं उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे थेट कोर्टासमोर हजर करुन योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

Tukaram Mundhe_Baba Ramdev_Patanjali Divya pharmacy
विना वीज, विना डिझेल आता हायड्रोजनवर धावणार रेल्वे; जाणून घ्या खासियत

तुकाराम मुंढेनी पदभार स्विकारल्यानंतर केवळ तीनच दिवसांत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर विभागात धडक करवाई करुन ५३ ठिकाणी धाडी टाकल्या, तसंच भेसळ करणाऱ्या ३३ जणांवर अटकची कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com