Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंकडे आता चंदेरी दुनियेची धाव : थर्ड क्लास जेवणावर FDA अधिकाऱ्यांच्या धाडी पडणार?

Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळकुक्त पदार्थांच्या दुकानांवर धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत.
Tukarma Mundhe_FDA Action
Tukarma Mundhe_FDA Action
Published on
Updated on

Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळकुक्त पदार्थांच्या दुकानांवर धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. त्यामुळं अशा लोकांचं चांगलंच धाब दणाणलं आहे. यानंतर आता मुंडेंकडं चित्रपट क्षेत्रातील सेट्सवर असलेल्या किचनच्या अस्वच्छतेबाबतही तक्रारी आल्याची माहिती आहे. त्यामुळं आता या चंदेरी दुनियाचं थर्ड क्लास जेवणावर त्यांची नजर असणार आहे. त्यामुळं इथल्या किचन्सवरही एफडीएच्या धाडी पडण्याची शक्यता आहे.

Tukarma Mundhe_FDA Action
BLO FIR: SIRच्या कामातील BLOवर गुन्हे दाखल; आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई

मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये सातत्याने मराठी, हिंदीसह विविध भाषांमधील मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजचे चित्रीकरणा सुरु असते. मात्र, या चंदेरी दुनियेच्या पडद्यामागे अहोरात्र राबणाऱ्या हजारो कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चित्रीकरण स्थळांवर पुरवल्या जाणाऱ्या अत्यंत निकृष्ट, अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक जेवणाविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाने थेट अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुंढे यांना पत्र पाठवून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून, सेटवरील अन्नसुरक्षेची तत्काळ तपासणी करण्याची मागणी केली आहे.

Tukarma Mundhe_FDA Action
Operation HardBall: बिश्नोई गँगच्या खात्म्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन! थेट अमेरिकेलाच दिलं कंत्राट; 'ऑपरेशन हार्डबॉल'ची जोरदार चर्चा

१२ ते १६ तासांची ड्युटी, अन् नशिबी 'अस्वच्छ' जेवण!

शूटिंगच्या ठिकाणी कलाकार, तंत्रज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी सलग १२ ते १६ तास किंवा त्याहून अधिक काम करत असतात. अशा परिस्थितीत त्यांना दर्जेदार, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न मिळणे ही संबंधित निर्मिती संस्था आणि केटरिंग कंत्राटदारांची कायदेशीर तसेच नैतिक जबाबदारी आहे. मात्र, नफेखोरीच्या नादात अनेक ठिकाणी अन्नसुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अस्वच्छ वातावरणात बनवले जाणारे अन्न आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य यामुळे सेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्याकडे केलेल्या प्रमुख मागण्या:

अचानक तपासणी मोहीम : राज्यभरातील सर्व चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळांवर FDA मार्फत अचानक धाडी टाकण्यात याव्यात.

FSSAI अंतर्गत चौकशी : सेटवर पुरविल्या जाणाऱ्या अन्नाचे नमुने गोळा करून त्यांची 'अन्नसुरक्षा व मानके अधिनियम' अंतर्गत प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासण्यात यावी.

कठोर कायदेशीर कारवाई : निकृष्ट आणि आरोग्यास घातक अन्न पुरविणारे केटरिंग कंत्राटदार आणि निष्काळजी निर्मिती संस्थांवर थेट फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी.

नियमावली जाहीर करणे : सर्व चित्रीकरण स्थळांसाठी अन्नाचा दर्जा, पाणी, साठवणूक आणि स्वयंपाकगृहाच्या स्वच्छतेबाबत स्पष्ट आणि कडक नियमावली जारी करण्यात यावी.

अधिवेशनानंतर शिष्टमंडळ भेट घेणार

चालू विधानमंडळ अधिवेशन संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ तुकाराम मुंढे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. या भेटीत सेटवरील दुरवस्थेचे थेट पुरावे सादर करून तत्काळ 'ऑन द स्पॉट' कारवाईची मागणी केली जाणार आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री आणि अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहे. आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com