Kolhapur News, 05 Dec : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेग येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन महापालिकांच्या निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेची यंदा पहिल्यांदा निवडणूक होणार आहे. एप्रिल ते मे महिन्यात या निवडणुकीचा धुव्वा उडणार आहे. अशातच इचलकरंजीच्या नव्या आमदाराची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) येणारी महापालिका एकत्र लढवणार असून महायुतीमध्ये सध्या तरी बेबनाव आहे. त्यामुळे इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. इच्छुकांनी सर्वोतोपरी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीने एकत्रपणे या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे. तर महायुतीमधील विस्कटलेली घडी पाहता भाजप (BJP) शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महापालिकेच्या निवडणुकीवरून बेबनाव असल्यामुळे आतापासूनच सर्वच कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेतील इच्छुक अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले. उमेदवाराच्या प्रचाराबरोबरच आपलाही प्रचाराचा टप्पा त्यांनी पूर्ण केला आहे. शिवाय आर्थिक गोष्टीतही इच्छुकांनी आपलीच कमांड ठेवून आयती संधी साधून घेतली आहे. त्यामुळे आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी महापौर पदावर दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.
शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून खचलेल्या कार्यकर्त्यांना उमेद देण्याची भावना या बैठकी मागे होती. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर येत आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही स्वबळावर लढू अशीच भूमिका दोन्ही गटांची सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांची कसोटी लागणार आहे.
ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत एकत्र काम केले त्याचे फलित आवाडे यांच्यासह शिंदेंच्या शिवसेनेला मिळाले. मात्र, दोन्हीही गटातून प्रभागांतील नेत्यांची तयारी या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांचा समझोता एक्सप्रेस धावण्यासाठी आवाडे, हळवनकर आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.