
Nashik Crime News : नाशिक शहरात गुंडगिरीने पुन्हा उचल खाल्ली आहे. बुधवारी रात्री दोन टोळ्यांनी वर्चस्ववादातून परस्परांवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारामुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. तर या गोळीबारात शिवसेनेशी "ती" टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. (Police claim to have seized two pistols along with three goons and car)
शहरात गेले काही दिवसापासून हत्या, वाहनांवरील हल्ले आणि गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. हे पोलिसांना थेट आव्हान असल्याची चर्चा आहे. याबाबत आता लोकप्रतिनिधींनी देखील आवाज उठविला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.9) रात्री शहरातील फर्नांडिसवाडी येथील गुंडांच्या दोन डोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून मोठा वाद झाला. रोहित डिगम आणि राहुल जग्वाल या दोन गुंडांच्या टोळीचे वाद झाले. त्यात परस्परांवर दहशत निर्माण करण्यासाठी दोन गुंडांनी प्रदीर्घकाळ एकमेकांवर गोळीबार केला. सुमारे तासभर हा राडा सुरू होता.
दरम्यान परिसरात राहणाऱ्या आणि एका टोळीशी संबंधित खटले चालविणाऱ्या महिला वकिलाच्या घरावरही जोरदार दगडफेक करण्यात आले. सोडा वॉटरच्या बाटल्या फेकण्यात या घटनेने परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावरही नागरिकांमध्ये दहशत होती. परिसरातील कोणीही नागरिक घराच्या बाहेर येण्यास तयार होत नव्हते. पोलिसांनी वारंवार आवाहन केल्यावर परिस्थिती निवळण्यास सुरुवात झाली. यानंतर आता गोळीबारप्रकरणी तीन गुंडांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गोळ्यादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
सकाळी पोलिसांनी तपास पुढे नेल्यानंतर गुंड विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. यामध्ये फायरिंगसाठी वापरलेल्या दोन गावठी पिस्तूल, एक कार आणि गुंडांना ताब्यात घेतले आहे. संबंधित गुंडांचा राजकीय नेत्यांची संबंध असल्याची चर्चा आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरात शिवसेनेच्या एका प्रतिस्पर्धी नेत्यावर कोळीबाराचा प्रयत्न झाला होता. या पुण्यात नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या नेत्याचा संबंध जोडला जात होता. याच टोळीतील गुंड पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली आहे.
नाशिक शहर गेले काही दिवस कायदा आणि सुव्यवस्था या प्रश्नावर चर्चेत आहे. पोलिसांकडून थेट गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात फारसे प्रयत्न होत असूनही त्याला यश आले नसल्याची तक्रार आहे. अशातच गोळीबाराची ही घटना घडल्याने टोळी युद्धाने उचल खाल्ली की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.