Shivsena Politics : फडणवीसांचा दौरा उरकताच शिंदेंचे शिलेदार दिल्ली दौऱ्यावर : शाहंची भेट घेऊन 'हिटलिस्ट' बदलणार?

Uday Samant and Shambhuraj Desai Delhi Tour : पावसाळी अधिवेशनात आणि त्यानंतर महायुतीतील काही मंत्र्यांवर सतत आरोप होताना दिसत आहेत. यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असून या वादग्रस्त मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय.
Amit Shah-Eknath shah-Devendra Fadnavis
Amit Shah-Eknath shah-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मंत्रीमंडळ फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.

  2. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत व शंभुराज देसाई दिल्लीत असून ते अमित शहांची भेट घेणार आहेत.

  3. वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.

Mumbai News : राज्यात सध्या आगामी स्थानिकच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यानंतर आता राज्यातील मंत्रीमंडळात फेरबदल केले जाणार यासह वादग्रस्त मंत्र्यांना नारळ दिला जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. ज्यात शिवसेनेचे मंत्री हिटलिस्टवर आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत आणि शंभुराज देसाई हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील ते भेट घेणार आहेत. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Devendra Fadnavis Delhi visit sparks speculation of cabinet reshuffle in Maharashtra, with Shinde group ministers Uday Samant and Shambhuraj Desai meeting Amit Shah amid controversy)

पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांचे मंत्री योगेश कदम आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. तसेच आमदार संजय गायकवाड यांनी देखील आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये जोरदार फायटींग केली होती. यामुळे शिवसेनेविरोधात राज्यात नाराजी आहे. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा कृषिमंत्री मानिकराव कोकाटेही अडचणीत आले आहे. यामुळे या सगळ्यांचा राजीनामा आता मागितला जात आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील यावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.

Amit Shah-Eknath shah-Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : महायुतीबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; ‘आपण विधानसभेत एकत्र आहोत, याचे भान ठेवा’

यामुळे नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रनणीती आखण्यात आली. पण याच बैठकीत वादग्रस्त मंत्र्याचे राजीनामे घेण्यासह मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चाही झाल्याची चर्चा राज्यात सुरू होती. अशातच उदय सामंत आणि शंभुराज देसाई दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सध्या चर्चा रंगली आहे.

शंभुराज देसाई हे त्यांच्या खात्याच्या संदर्भात बैठका असल्याने दिल्लीला गेले आहेत. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमिवर उदय सामंत दिल्लीला गेले आहेत. विशेष म्हणजे उदय सामंत आणि शंभुराज देसाई हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेणार आहेत. यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Amit Shah-Eknath shah-Devendra Fadnavis
Devendra Fadnavis warning : मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर येताच फडणवीसांनी ठणकावलं; शिरसाट यांच्या मुळ मुद्द्यावरच घाव...

FAQs :

1. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा काय उद्देश होता?
→ केंद्रीय नेत्यांशी मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा आणि आगामी राजकीय धोरणांसाठी दौरा झाला.

2. कोणते मंत्री ‘हिटलिस्ट’वर असल्याचे बोलले जाते?
→ शिवसेनेचे काही मंत्री, विशेषतः उदय सामंत आणि शंभुराज देसाई, यांची नावे चर्चेत आहेत.

3. अमित शहांची भेट का महत्त्वाची मानली जाते?
→ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी होणारी चर्चा ही मंत्रीमंडळ फेरबदलात निर्णायक ठरू शकते.

4. शिंदे गटाला याचा राजकीय फटका बसू शकतो का?
→ होय, शिंदे गटातील वादग्रस्त मंत्र्यांवर जर कारवाई झाली तर पक्षाला तडाखा बसू शकतो.

5. मंत्रीमंडळ फेरबदल कधी अपेक्षित आहे?
→ अधिकृत घोषणा झालेली नाही, पण येत्या काही आठवड्यांत घडामोडी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com