Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुती ॲक्शन मोडवर, मुंबईत घडामोडींना वेग; 'त्या' महत्त्वाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय?

Mahayuti Meeting News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता राज्यातील महायुती ॲक्शन मोडवर आली असून त्यासाठी आता बुधवारी रात्री मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
Mahayuti MLC Election 2026 Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील उपसभापतीची निवड बिनविरोध पार पडली. उपसभापती पदावर ठाकरे यांच्या शिवसेनेतून आलेल्या सचिन आहेर यांची वर्णी लागली आहे. त्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता राज्यातील महायुती ॲक्शन मोडवर आली असून त्यासाठी आता बुधवारी रात्री मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यातच राज्यात वेगवान घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदारांनी बंड करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याने मंत्रिमंडळ विस्तराच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच राज्यातील फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे आता बुधवारी रात्री मुंबईत महायुतीच्या तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
Raigad ZP : रायगड ZPबाबत मोठी घडामोड; सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार, बैठकीला तटकरे, सामंतांची हजेरी

या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना (shivsena) व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. या समन्वय समितीच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. ठाकरे सेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याने आता त्यांचे संख्याबळ 13 इतके झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आता किती मंत्रिपदे येणार याची उत्सुकता लागली आहे.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
Shiv Sena UBT in Trouble : भाऊसाहेब वाकचौरे ऑनलाईन हजर होते की, कुटुंबियांसोबत बाहेरगावी? ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेत आणखी भर

त्यासोबतच राष्ट्र्रवादी काँग्रेसला (NCP) गेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी केंद्रात मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याची उत्सुकता लागली आहे. गेल्यावेळीच प्रफुल्ल पटेल यांनी स्वतंत्र पदभार असलेले मंत्रिपद नाकारत त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मागितले होते. त्यामुळे आता त्याबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे. त्यासोबतच भाजपकडून महाराष्ट्रातील किती जणांना संधी दिली जाणार याची उत्सुकता लागली आहे.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
Sanjay Jadhav Skips Meeting : ‘मातोश्री’लाही दांडी, MVA बैठकीतही गैरहजर; संजय जाधवांचं ‘काहीतरी ठरलंय’ का?

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांचे कॅबिनेट मंत्रिपदासाठी तर राज्यमंत्रिपदासाठी संजय जाधव, ओम राजेनिंबाळकर, संजय दीना पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या पैकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

Mahayuti MLC Election 2026  Eknath Shinde Sunetra pawar Devendra fadnavis
shivsena UBT news : ठाकरे ओमराजेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; धाराशिवमधील 'त्या' नेत्यांना मातोश्रीवर बोलावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com