Uday Samant Video : भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पाडली फूट? उदय सामंतांनी 'त्या' दाव्याची सत्यता सांगितली

Uday Samant On Eknath Shinde Shivsena Split :भाजपच आत्ता शिंदेंच्या शिवसेनेते फूट पाडत असून उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Uday Samant News : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली. मात्र, भाजपच आत्ता शिंदेंच्या शिवसेनेते फूट पाडत असून उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच 'उदय' होणार होता पण शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वालाखाची राहिली', असे देखील राऊत म्हणाले. राऊत यांनी केलेल्या दाव्याला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, मी विमानतळावर उतरल्यानंतर संजय राऊत यांने केलेले वक्तव्याचा व्हिडिओ पाहिला. ते जे बोलत आहेत तो धांदांत बालिशपणा आहे. माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावात मी सहभागी होतो म्हणूनच मला दोनदा उद्योगमंत्री पद मिळाले, याची मला जाणीव आहे.

Uday Samant
Vijay Wadettiwar : आता शिवसेनेचा ‘उदय' झाला भाजपला लाडका; विजय वडेट्टीवारांचा टोला (पाहा VIDEO)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळे कुणीही आमच्यात वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्यास तो यशस्वी होणार नाही, अशा शब्दांत उदय सामंतांनी राऊतांना उत्तर दिले.

भाजपने उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून शिंदेंना आपल्याकडे आणले. आता त्यांनाच फोडण्याचे प्रयत्न केले जात आहे. अशी सध्याची राजकीय परिस्थिती असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच उदय सामंत यांच्याकडे 20 आमदरा असल्याचा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

विजय वडेट्टीवारांना उत्तर

विजय वडेट्टीवार यांना मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांना माहिती आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालो आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील दोन लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजुला करण्याचे षडयंत्र खेळू नका. भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटला याची माहिती माझ्याकडे आहे. मात्र, मी राजकीय संकेत पाळत असल्याने बोलत नाही, असे देखील सामंत म्हणाले.

Uday Samant
Eknath Shinde: शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी सांगितले थेट नाशिकच्या नव्या पालकमंत्र्यांचे नाव; केवळ घोषणा बाकी ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com