Vijay Wadettiwar : आता शिवसेनेचा ‘उदय' झाला भाजपला लाडका; विजय वडेट्टीवारांचा टोला (पाहा VIDEO)

Congress Vijay Wadettiwar Nagpur DCM Eknath Shinde ShivSena : माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वेगळेच वारे वाहत असल्याचे संकेत दिले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार नाराज होत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढत चालली आहे.

तसेही त्यांची आता गरज संपली आहे. त्यामुळे शिंदेंना बाजूला सारून शिवसेनेचा ‘उदय' भाजपला जास्त लाडका झाल्याचे माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. या माध्यमातून त्यांनी शिंदे यांची शिवसेनाही फुटणार असल्याचे संकेत दिले.

एकनाथ शिंदे यांचे नाराजी दाखवून अधिक काही पदरात मिळते का? हेच करीत आहेत. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांना बाजूला करण्याचेही प्रयत्न केले जात आहे. भाजपने (BJP) उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून शिंदेंना आपल्याकडे आणले. आता त्यांनाच फोडण्याचे प्रयत्न केले जात आहे. अशी सध्याची राजकीय परिस्थिती असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे, संजय राऊत यांनीसुद्धा उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काहीतरी शिजत असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

Vijay Wadettiwar
Eknath Shinde politics : एकनाथ शिंदे 'इफेक्ट'? दादा भुसेंचे पुनर्वसन की जिल्हा निर्मिती?

पालकमंत्री पदाबाबतही महायुतीमध्ये सावळागोंधळ सुरू आहे. एवढे बहुमत असताना आपसात मतभेद वाढले आहे. सत्तेसाठी, पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ‘भांडा सौख्यभरे‘ असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज दोन जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले. उद्या मंत्री बदलायची, नंतर उपमुख्यमंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री बदलायची वेळ या सरकारवर येईल, असेही भाकीत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वर्तविले.

Vijay Wadettiwar
NCP on Mahayuti : सरकारची ‘कामे कमी आणि नखरे जास्त’ राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याकडून महायुती सरकारवर टीकास्त्र

पंकजा मुंडे यांना आता दुःख करून काही मिळणार नाही. एक-एक ओबीसीचे मत घेऊ महायुती सत्तेवर आली. आता ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे नेतृत्वहीन करायचे प्रयत्न भाजप करीत आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांनाही टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका, घात होईल, असा सल्ला आपण दिल्याचा दावा केला होता.

यावर वडेट्टीवार म्हणाले, "अंगावर आल्यावर सगळे आठवते. त्यावेळेस का नाही आठवले? पुढाकार घेऊन रोखले का नाही? असा सवाल करून दादासोबत जाणारा पहिला माणूस धनंजय मुंडे स्वतःच होता असेही सांगितले. सिल्लोड येथील बांगलादेशीच्या मुद्यावरून भाजपचे नेते किरीट सोमया यांनाही वडेट्टीवार यांनी आव्हान दिले".

'अब्दुल सत्तार मंत्री असताना त्यांना बांगलादेशी कधीच दिसले नाहीत.आता ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे आता बांगलादेशी आठवायला लागले. भाजपकडे साडेसात वर्षापासून गृहमंत्रीपद आहे. तेव्हाच का त्यांना रोखले नाही. मतांचे पोलोरायझेशन करण्यासाठी हे सर्व सुरू आहे', असा आरोपही यावेळी वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com