SIR News : ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरुद्ध महाएल्गार! थेट मुख्य निवडणूक आयुक्तांवर शिवतीर्थावरून ललकारणार

Thackeray brothers SIR protest News : संयुक्त मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवारी ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेणार आहेत.
Uddhav, Raj thackeray
Uddhav, Raj thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : देशभरामध्ये एसआयआरवरून वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निवडणूक आयोगातील हुकुमशाहीवरून टीका केली जात असतानाच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडून 4 ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा करण्यात आल्यानंतर आता या संयुक्त मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवारी सकाळी 11.30 वाजता ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते सहभागी होणार आहेत. दुसरीकडे या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार का? या संदर्भाने महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. दुसरीकडे ठाकरे बंधूकडून या मोर्चाचे पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्यने नागरिक सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरुद्ध 4 ऑक्टोबरला महाएल्गार होणार आहे, याबाबतची अधिक माहिती देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची संयुक्त पत्रकार परिषद २९ सप्टेंबरला शिवतीर्थ येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे. त्यामुळे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांवर राज, उद्धव ठाकरे निशाणा साधणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav, Raj thackeray
Maharashtra Political Live Update : मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते दुग्ध विभागाच्या कार्यालय परिसरात मांडला ठिय्या, काहींची अधिकाऱ्यांना शिवीगाळ

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने मुंबईमधूनच आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्क येथून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

Uddhav, Raj thackeray
Maharashtra Politics Live Update : मुंबईतील धक्कादायक घटना,लोकलमधून प्रवाशाला किरकोळ वादातून वांद्रे खाडीजवळ ढकलून दिलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com