
Mumbai News : आजच मुंबईत मराठी माणसासाठी दिवाळी आणि दसरा साजरा झाला. राज्यातील मराठी माणसाची तब्बल 20 वर्षानंतर इच्छा पूर्ण झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अखेर एकत्र आले. यानंतर आता त्यांची युती होणार का? राज आणि उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेला एकत्र सामोरं जाणार का? असे सवाल उपस्थित केले जात होते. या प्रश्नांवर आता शिवसेना खासदार खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. तसेच त्यांनी इंडिया आघाडीबाबत देखील मोठे वक्तव्य केलं आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीची देखील चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी, महारष्ट्रातील जनतेने उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणले आहे. आता ते एकत्र निवडणुका लढतील का याची चर्चा सुरू झाली आहे. तसे प्रश्नही विचारले जात आहेत. आता याबद्दल हे दोघे बंधू चर्चा करतील. त्याचवेळी राऊत यांना इंडिया आघाडीबद्दल विचारले असता, त्यांनी आम्ही अजूनही इंडिया आघाडीचाच भाग आहोत. पण भविष्यात काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही.
आता होणाऱ्या निवडणूका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. ज्या वेगळ्या असतात. त्यामुळे निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढवल्या जाऊ जातात. त्यावेळी वेगळी युती असू शकते, असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. यामुळे आता इंडिया आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यासह राज्यातील महाविकास आघाडीतही फूट पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
यावेळी राऊत म्हणाले, आज फक्त ठाकरे बंधू एकत्र आले नसून ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे. त्यामुळे आता भविष्यातील राजकारणही ते एकत्र येतील, असा सूचक संकेत यावेळी त्यांनी दिले असून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाचढवला. राऊत म्हणाले, आम्ही शिंदे यांना पक्ष मानत नाही. ते अमित शहा आणि भाजपच्या भरवशावर जगतात. त्यांनी आमच्यात कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत. तर राज्यातील मुस्लिम मतदार आणि त्यांच्या मतांची आता काळजी आम्ही नाही तर त्यांनी करावी लागेल. राज्यातील मुस्लिम आमच्यासोबत आहेत.
यावेळी राऊत यांनी राज ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावलेल्या टोल्याचा धागा धरत, जे बाळासाहेबांना शक्य झालं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं. त्यांनी दोन्ही भावांना एकत्र आणलं. पण खरं काम हे सरकारच्या एका निर्णयाने केलं. सरकारने आणलेल्या हिंदी सक्तीच्या दोन्ही निर्णयांनी केलं. सरकारचा खरा उद्देश हा त्रिभाषा धोरण राज्यावर लादण्याचा, हिंदी लादण्याचा होता, असा आरोप राऊत यांनी केलाय. या सरकारचा खरा उद्देश मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा असल्याचा आरोपही यावेळ राऊत यांनी केला आहे. तर भाजपची रणनीती स्पष्ट असून 'फोडा आणि राज्य करा' हेच त्यांचे तत्व आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.