Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची सध्या लगीनघाई सुरु आहे. महायुती स्वबळावर लढणार की एकत्रित निवडणूक लढणार यावरून चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे समजते. त्यातच आता गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
मनसे व ठाकरे गटाच्या युतीबाबत पुढे काही चर्चा सरकत नसताना याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मोठे विधान केले आहे. ठाकरे बंधू युतीबाबत योग्यवेळी निर्णय घेतील असे सांगत वेळ आल्यांनतर त्याबाबतचा पडदा उघडणार असल्याचे त्यांनी थेटच सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
संजय राऊत म्हणाले की, पडदा उघडायला वेळ आहे. तो योग्य वेळी उघडला जाईल. युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्यासोबत होईल, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचा चर्चा नाही. मी सांगत आहे ना, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले. राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक भूमिका घेतली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात भावना असेल, तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही, अशी भूमिका उध्दव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी घेतली आहे. युतीची चर्चा थेट राज ठाकरे यांच्यासोबत होईल. पण हा पडदा उघडायला वेळ आहे. तो योग्य वेळी उघडला जाईल, असा दावा राऊत यांनी केला आहे.
मनसेच्या काही नेत्याकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून उलटसुलट विधाने केली जात आहेत. मात्र, त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, या दोन बंधूंच्या युतीबाबत दोघेच चर्चा करणार आहेत. त्यामुळे या विषयात इतरांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.