MP Disqualification Case : उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे 6 खासदार अपात्र ठरणार? आज कोर्टात सुनावणी

Uddhav Thackeray MP Disqualification : उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्याविरोधात न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackera News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या विलीनीकरणाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांनी मंजुरी दिली. त्याविरोधात ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे.

विकासकामे होत नसल्याचे कारण देत तसेच उद्धव ठाकरे हे भेटण्यासाठी उपसब्ध नसल्याचा दावा करत जून महिन्यात ओमराजे निंबाळकर (धाराशीव),संजय दिना पाटील (मुंबई उत्तर-पूर्व), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), संजय जाधव (परभणी), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) या खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली.

सावंत यांच्या याचिकेतून या विलीनीकरणाला अवैध ठरवत फुटीर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या खासदारांना अपात्र ठरण्यात येणार की नाही याचा फैसला कोर्टा करणार आहेत.

Uddhav Thackeray
Shiv Sena News : उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेनंतर शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट निशाणा; म्हणाले,'पीएम मोदी तुम्हालाही.....'

'ते' खासदार पंतप्रधानांना भेटले

न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी फुटीर खासदारांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत मी तुमच्या पाठीशी आहे, असा शब्द पंतप्रधानांनी त्यांना दिला होता. त्यावरून ठाकरेंनी देखील मोदींवर टीका करत हा संदेश न्यायालयावर दबाव टाकण्यासाठी आहे का, असा सवाल त्यांनी केला.

Uddhav Thackeray
Shivsena News : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांसाठी PM मोदींची 'हॉटलाईन'; ब्रेकफास्ट बैठकीत मोठा संदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com