Shiv Sena News : उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेनंतर शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट निशाणा; म्हणाले,'पीएम मोदी तुम्हालाही.....'

Eknath shinde party leadear News : पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने थेट निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासॊबत गेलेल्या सहा खासदारांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याच काळात भेट घेतल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने थेट निशाणा साधला आहे.

दोन दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेल्या सहा बंडखोर खासदारानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना स्वतःच्या खासदारांना भेटण्यासाठी वेळ नसतो, संसदेत येण्यासाठी वेळ नसतो, मात्र ते बंडखोर खासदारांना भेटून काय संदेश देत आहेत, अशी टीका केली.

या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतो. ज्यांना वेळ दिलेली असते त्यांना ते भेटतात. उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांच्याकडे वेळ मागावी. त्यांनाही भेटण्यासाठी वेळ मिळेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics Live Update : मराठी न बोलल्यास कारवाई अटळ: प्रताप सरनाईक

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता राज्यातील वातावरण चांगलेच तापणार आहे. पाटील यांच्या टीकेला आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्ह कोणाचे याच्यावर सुनावणी सुरु आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Political Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. राजकीय वर्तुळात या विमान प्रवासाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, 'विमानामध्ये काय कोणीही प्रवास करू शकतो. आता विमानामधून प्रवास करताना माझ्यासोबत राहुल गांधी देखील प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मनाई आहे का? असा सवाल यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com