Uddhav Thackeray : 'वक्फच्या जमिनींवर भाजपाचा डोळा, ईदच्या मेजवान्या झोडल्या अन्' उद्धव ठाकरेंचा दावा

Uddhav Thackeray On BJPs Waqf Bill : नुकताच केंद्रातील मोदी सरकारने वक्फचं विधेयक लोकसभेत मांडलं. त्या विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे.
Uddhav Thackeray On Waqf Bill
Uddhav Thackeray On Waqf Billsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बहूचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयकास लोकसभेत बुधवारी (ता.2) मंजुरी मिळाली आहे. आता ते राज्यसभेत मांडले जाणार आहे. यादरम्यान विरोधकांनी हे विधेयक देसातील मुस्लिमांच्या विरोधात असून ते रद्द झाले पाहिजे अशी मागणी केली आहे. तर या विधेयकाला ठाकरे गटाने विरोध केला आहे. यावरून भाजपसह शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेला माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी भाजपची दुटप्पी भूमिका असून त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका केली आहे. ही टीका उद्धव ठाकरे यांनी आज (ता.3) पत्रकार परिषद घेऊन केली.

यावेळी ठाकरे यांनी, ही चर्चा करण्यासाठी 2 आणि 3 एप्रिल हे दिवस फक्त अमेरिकेने भारताला दिलेल्या असकार्यावर पडदा टाकण्यासाठी भाजपने निवडले. अमेरिकेने, तुम्ही जसे करता तसेच करत कर लादू असा इशारा दिला. यावरून दुर्लक्ष करण्यासाठीच भाजपने हा प्लॅन आखला आणि वक्फ विधेयक आणलं असा दावा ठाकरेंनी केला आहे. तर या टेरिफचा लोकांना विसर पडवा म्हणून आधी ईदच्या पार्ट्या झोडल्या आणि विधेयक आणल्याचा आरोप देखील ठाकरेंनी केलाय.

यावेळी ठाकरे यांनी, भारत आर्थिक संकटाच्य गर्तेत जात असून देशाला विश्वासात घ्यायला हवं. कोणती पावलं उचलावीत? परिणामांची चर्चा या सरकारने करायला हवी होती. पण सगळे विषय बाजूला सारून या विधेयकाची चर्चा लावली. ईदच्या मेजवान्या झोडल्या आणि वक्फचं बिल मांडलं. आता ते मंजुरही करून घेतलं आहे. पण ज्यांनी वक्फचं बिल मांडलं ते किरण रिजेजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. हे कदाचित भाजपला माहित नसावं. की हा योगायोग म्हणावा, असेही टीका ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray On Waqf Bill
Uddhav Thackeray BJP Clash : उद्धव ठाकरेंना भाजपने खिंडीत गाठले! वक्फवरून केली पुन्हा कोंडी ?

यावेळी भाजपवर ठाकरे यांनी टीका करताना, भाजपची भूमिकाच सध्या न कळण्यासारखी आहे. हे आधी औरंगजेबची कबर खोदायला जातात आणि नंतर यांचाच आदेश येतो की थांबा. यावरूनच दिसत की भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

वक्फच्या जमिनींवर डोळा

जिन्नानाही लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू अमित शाह यांच्यापासून भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी घतली आहे. पण आता तुम्ही सगळ्यांनी हिंदुत्व सोडलं का? असा सवाल निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आम्हाला बाळासाहेबांचे विचार माहित आहेत. बाळासाहेबांनी प्रार्थनसेसाठी मुस्लिमांना दिलेली जागा बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या घशात घातली गेलीय. आतातर वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा असल्याचे आरोपही ठाकरे यांनी केलाय.

आधी आम्ही 370 कलम काढताना पाठिंबा दिला होता. जो हजारो कश्मिरी पंडीत निर्वासितांसाठी होता. त्यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला आपसा दाखवला होता. पण 370 काढत काय मिळालं? किती जमिनी काश्मिरी पंडितांना परत मिळाल्या? याचा भाजपाच्या लोकांनी, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं. याच भाजपने आजपर्यंत पाकव्याप्त काश्मीर, चीनच्या अतिक्रमाणबाबत कोणतीच भूमिका घेतलेली नाही.

Uddhav Thackeray On Waqf Bill
Devendra Fadnavis to Uddhav Thackeray : 'वक्फ' सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले...

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळातील त्यांच्या घरातून काम करण्याच्या होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला आहे. यावेळी ठाकरे यांनी करोना काळात मी, मुख्यमंत्री होतो. तेव्हा मोदीही घरी बसूनच काम करत होते. त्याचवेळी चीन अरुणाचल प्रदेशात घुसला होता. तेव्हा मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती. तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी संवाद साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com