

Mumbai News : देशभरातील विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नावर आंदोलन केले. त्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेत नाहीत. मात्र, दुसरीकडे साथ सोडून गेलेल्या सहा बंडखोर खासदारांना पीएम मोदी का भेटले? असा सवाल उपस्थित करीत केंद्र सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाची सुनावणी सुरु आहे. या सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत आम्ही आशावादी आहोत. चार वर्षानंतर या ठिकाणी निकालाची अपेक्षा आहे. संविधाप्रमाणे निकाल द्यावा, अशी आमची अपेक्षा असल्याचे ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये संविधाप्रमाणे निकाल द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. देशातील राजकारणात मतलबी वारे सुरु आहेत, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. जालियानवाला बाग हत्याकांडाची आठवण होईल असे अत्याचार विद्यार्थ्यांवर झाले आहेत. मात्र, त्यांची भेट घेण्यास पीएम मोदी यांना वेळ नाही. उलटपक्षी भिऊ नकोस मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत ते बंडखोर खासदार मंडळींना भेट देऊन कोणता संदेश देत आहेत, असा सवाल केला.
खासदारांच्या बंडखोरीचा डाग कोणीच पुसू शकत नाही. त्यामुळे या मंडळींना कोणीच पाठीशी घालू नये. या भेटीचे कात्रण सुनावणी सुरु असलेल्या कोर्टकडे सादर करणार असून मोदींनी नेमकी कोणाला संदेश दिला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येऊन लढाई लढायला हवी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
मोदी आंदोलकांना, विद्यार्थ्यांना भेटत नाहीत, पण बंडखोर खासदारांना भेटतात. त्यांना मी तुमच्या पाठिशी आहे, असे सांगत आहेत. बंद दाराआडची चर्चा होती. तर त्यातील वाक्य बाहेर येण्याचं कारण काय. कुणाला संदेश द्यायचा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीने शिंदे टेन्शनमध्ये आल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्यासाठी तर हे वाक्य नाही ना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हा संदेश कुणाला देत आहेत? शिंदे पूर्वी अमित शाह यांना भेटायचे. आता मोदींना भेटत आहेत. शाह इथे असताना ते मोदींना भेटतात. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा धमकी वजा संदेश मोदींनी कुणाला दिला ? शाहांना, कोर्टाला की फडणवीस यांना दिला ? असे ठाकरेंनी पत्रकार परिषदेवेळी स्पष्टच विचारले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.