
Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीच्या अनुषगाने उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आल्याने उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येतील अशी चर्चा रंगली असतानाच आता पुन्हा एकदा आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढायची की स्वतंत्र लढायची याबाबतही विचार विनिमय सुरु आहे. तशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत केली असल्याचे समजते.
एकीकडे आगामी काळात होत असलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात सातत्याने भेटीगाठी होत असल्याने मनसे (Mns) व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. यामुळे आगामी काळात काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच याबाबतची मोठी घोषणा होण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची शुक्रवारी महत्त्वाची घडामोड घडली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हाप्रमुखांची महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाप्रमुखांच्या या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत, नगर पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीसोबत लढावे की मनसेसोबत युती करावी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जिल्हा प्रमुखांना केले आहे. स्थानिक पातळीवरची ताकद ओळखून याबाबत काय निर्णय घ्यावा हे सूचित करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
आपली कुठे ताकद आहे, याबाबत माहिती द्या. आघाडीसोबत निवडणूक लढवण्याबाबत काय मत आहे, ते लवकर मांडावे जेणेकरुन निर्णय घेता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नगर पंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे कामाला लागा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.