Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर! ऑपरेशन टायगर पार्ट 2?

Uddhav Thackeray MLAs Absentanjay : उद्धव ठाकरेंनी आज बोलावलेल्या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिले आहेत. तीन आमदारांनी गैरहजर राहण्याची कारणे दिली आहेत.
Shivsena News
Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खासदार फुटल्यानंतर आज आपल्या 20 आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला चार आमदार गैरहजर असल्याचे समोर आले आहे. संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस तर सुनील शिंदे हे आमदार या बैठकीला गैरहजर असल्याची माहिती आहे.

आमदारांची बैठक ठाकरेंनी 'शिवालया'मध्ये बोलावलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांनी गैरहजर राहण्याची कारणे सांगितली आहेत. राहुल पाटील निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. आज विधान परिषदेच्या निवडणुकींचा निकाल आहे, त्यामध्ये ते व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे सुनील शिंदे यांच्या गावी पूजा असल्याने ते बैठकीला हजर नसल्याचे सांगितले आहे.

आमदार संजय दरेकर जे वनीचे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या गावी पालखी आज जाणार आणि त्या अनुषंगाने ते आज बैठकीला आले नाहीत. तर उद्या ते मुंबईत येतील, याबाबतची माहिती देखील त्यांनी पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलेली आहे. मात्र आता फक्त संजय पोतणीस बैठकीला का आले नाही,याबाबतची माहिती समोर येऊ शकली नाही.

Shivsena News
Nashik MLC Election : एक दराडे थोडक्यात वाचले, पण भाजपने दुसऱ्या दराडेंचा राजकीय बळी दिलाच

ठाकरेंच्या बैठकीत काय चर्चा?

साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंनी घेतेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर होणार. यामध्ये खासदारांबाबत, जे जे खासदार फुटीर झालेले आहेत त्यांच्या विषयी देखील चर्चा केली जाईल. सोबतच आमदारांचे जे मुद्दे आहेत, त्या आमदारांच्या मुद्द्यांवर त्यांचे नेमके काय म्हणणं आहे ते देखील उद्धव ठाकरे समजून घेतले.

Shivsena News
Operation Tiger : 'खासदार फोडले आता आमदारांची गरज काय? विरोधी आवाज संपवायचाय का?'; शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'वर भाजप आमदाराची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com