Operation Tiger : 'खासदार फोडले आता आमदारांची गरज काय? विरोधी आवाज संपवायचाय का?'; शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'वर भाजप आमदाराची टीका

BJP MLA Ashish Deshmukh On Operation Tiger : राज्यात एकनाथ शिंदेंचे ऑपरेशन टायगर हे सक्सेस झाले असून आता ठाकरेंचे आमदारही फुटणार असल्याची चर्चा आहे.
Shivsena Operation Tiger; Eknath Shinde
Shivsena Operation Tiger; Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Shivsena Operation Tiger News : राज्यातील राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेश टायगरने पुन्हा एकदा भूकंप आणला असून 6 खासदांनी ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. यानंतर आता ऑपरेश टायगरचा दुसऱ्या अंकाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खासदारांपाठोपाठ ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्याबरोबर जातील असे बोलले जात आहे. यावरून एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली असतानाच भाजपच्या गोटातही ऑपरेश टायगरने खळबळ उडवून दिली आहे. शिंदेंच्या ऑपरेश टायगरबाबत भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

राज्यात ठाकरेंचे 9 खासदार असून त्यापैकी 6 खासदारांनी ठाकरेंपासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. तर हे सर्व आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यादरम्यान ठाकरेंनी आपल्या 20 आमदारांची तातडीने बैठक घेत पक्षाची बांधणीकडे लक्ष घातले आहे. मात्र याच वेळी त्यांचे 14 आमदारही फुटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. असे झाल्यास ठाकरेंकडे केवळ 6 आमदार उरतील.

दरम्यान आता भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी ऑपरेश टायगरवर भाष्य केलं आहे. त्यांचे याबाबत एबीपी माझावर वृत्त आले असून यात त्यांनी ऑपरेश टायगरवर बोलताना खासदार येत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला आमदारांची गरज काय असा सवाल महायुतीला विचारला आहे. देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपला हादरे बसत असल्याची चर्चा रंगली आहे.

Shivsena Operation Tiger; Eknath Shinde
Operation Tiger update : 'ऑपरेशन' करूनच खासदार फोडले! एकनाथ शिंदेंनी ओमराजे, आष्टीकरांना उघडे पाडले...

देशमुख यांनी महाराष्ट्रात आधीच 235 च्या पुढे आमदारांचं बहुमत असताना आणखी किती आमदार महायुतीत घेणार? असा सवाल उपस्थित करत आमच्याकडे 237 आमदार आहेत, चार ते पाच अपक्षांचा पाठिंबा आहे. यामुळे तीन चतुर्थांश बहुमत आहे. यामुळे आणखी आमदारांची गरज नाही. आणि असेल तर ती कशाला असा प्रश्न आता माझ्या माझ्यासारख्या आमदाराला पडत असल्याचेही देशमुख यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी, विकासाच्या प्रक्रियेत आणखी गर्दी नको असे म्हणत प्रगल्भ लोकशाहीमध्ये विरोधी आवाज असायला हवा, असे म्हटलं आहे. तसेच जर सर्वच इकडे आले तर पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी कशी द्यायची? हा मोठा प्रश्न असणार असून यामुळे आमच्या पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही? पण इतरांनी जिथे आहात तिथेच सुखी राहावे. गुण्यागोविंदाने रहावे, असा सल्ला दिला आहे.

Shivsena Operation Tiger; Eknath Shinde
Eknath Shinde Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ अडकलं? 6 पैकी फक्त 2 खासदार एकनाथ शिंदेंसोबत; उर्वरित 4 कुठे गायब?

आम्हाला गरज नाही...

यावेळी आशिष देशमुख यांना शिंदेंचे ऑपरेशन टायगर आणि असे प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेसाठी आहे की भाजपसाठी असा सवाल केला असता ते म्हणाले की, आम्हाला (भाजप) अशा ऑपरेशनची गरज नाही. भाजप कधी असे ऑपरेशन करत नाही किंवा यात आम्हाला रस देखील नाही. त्यामुळे जे, 'ये तो अभी तो ट्रेलर आहे, झाकी अभी बाकी हैं', म्हणतात ना त्यांनी थोडा धीर धरावा, असेही आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com