Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरेंच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर; स्वतःच सांगितले 'हे' कारण

Shiv Sena MLAs absent News : यावेळी बैठकीस दोन आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच दोन आमदार बैठकीस अनुपस्थित राहण्याचे नेमके कारण समोर आले आहे.
Uddhav Tahckeray
Uddhav TahckeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनातील रणनीती ठरली. यावेळी बैठकीस दोन आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच दोन आमदार बैठकीस अनुपस्थित राहण्याचे नेमके कारण समोर आले आहे.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, बार्शीचे आमदार दिलीप सोपल गैरहजर होते. त्या दोघानीही वैयक्तिक कारणासाठी गैरहजर राहणार असल्याची पूर्वकल्पना हायकमांडला दिली असल्याचे समोर आले आहे.

Uddhav Tahckeray
Swargate Crime: राज्यात पुन्हा 'एन्काऊंटर स्कॉड'...? स्वारगेट बलात्कार घटनेनंतर संतापलेल्या 'या' शिवसेना आमदाराचे मोठे संकेत

दुसरीकडे या बैठकीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाप्रसंगी सर्व आमदारांनी मिळून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते.

Uddhav Tahckeray
Swargate Incidence : आरोपी दत्ता गाडेच्या अटकेचा थरार, कसा पकडला?, पाहा सविस्तर

त्यासोबतच या बैठकीत अधिवेशनकाळात पक्षाने घ्यावयाच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच येत्या काळात महाविकास आघाडीच्या आमदारांना सोबत घेऊन राज्य सरकारच्या विरोधात प्रखर भूमिका घेण्याचे ठरले. यावेळी ठाकरे गटाचे विधानसभेतील व विधानपरिषदेतील सर्व आमदार उपस्थित होते.

Uddhav Tahckeray
Datta Gade Arrested : 'मला प्रचंड भूक लागलीय, जे काही केलंय, त्याचा पश्चाताप होतोय...,भेदरलेला दत्ता गाडे नातेवाईकांजवळ ढसाढसा रडला....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com