

Uday Samant News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खासदार फुटल्यानंतर आक्रमक पवित्र घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर तातडीने आमदारांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहे. मात्र, खासदारांप्रमाणे आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या बैठकीबाबत सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, '9 खासदारांची बैठक घेऊन देखील सहा खासदार फुटले ना. त्यामुळे आता बैठक लावली तरी येणारे काही थांबणार नाहीत.'
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, 'ज्या पद्धतीने राजकारण पुढे जात आहे, शिवसेना पुढे जात आहे ते पाहता मागील 15 दिवसात आमच्याकडे खासदार आले, सचिनभाई अहिर आले. गोकुळ गिते आले, किरण सरनाईक आले, तीन विधानसभेचे आमदार देखील शिवसेनेमध्ये आले. शिवसेनेचा विधान परिषदेचा आकडा आता १४ पर्यंत गेला आहे.'
संजय राऊत यांनी काँग्रेसचा विधानसभेचा आमदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 20 कोटीची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. यावर उदय सामंत यांनी फिरकी घेत म्हटले की, '30 कोटी त्यांनी कमी सांगितले का? असा सवाल केला. ते म्हणाले, साडेचार वर्षापूर्वी त्यांनी ५० कोटीचा आकडा सांगितला होता. आता २० कोटींचा आकडा सांगितला आहे. महाराष्ट्राची जनता यावर विश्वास ठेवत नाही.'
हिंदुत्वापासून दूर गेल्यामुळे आपला मतदार दूर जात असल्याचे उद्धव ठाकरे यांना त्यांचे आमदार सांगत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. राम मंदिरातील चोरीनंतर त्यांनी रामरक्षा आंदोलन हाती घेतले आहे. दादर येथे महाआरती करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत ठाकरे डॅमेज कंट्रोल करू पाहत आहेत, मात्र आता त्याचा फायदा नाही, अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.