

Shivsena UBT News : उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर खासदारांची बैठक घेतली. या बैठकीला चार खासदारा प्रत्यक्ष तर पाच खासदार ऑनलाईन पद्धतीने हजर होते. या बैठीकनंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तब्बल 6 खासदार वेगळा गट तयार करण्याच्या तयारी आहेत. या विषयी सुत्रांच्या हवाल्याने साम टिव्हीने वृत्त दिले आहे.
ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी शिंदे शिवसेनेते खासदार, मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्यानंतर पक्षात फूट पडून ठाकरेंचे पाच खासदार नवा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर मंगळवारी (ता.16) संजय जाधव, संजय देशमुख, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीत दाखल झाले आहेत.
ठाकरेंचे खासदार हे उद्या (बुधवारी) लोकसभा अध्यक्षांना भेटून पत्र देण्याची शक्यता आहे. हे खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
ऑपरेशन टायगरच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी रविवारी मातोश्रीवर बैठक घेतल्यानंतर आपल्या खासदारांना विश्वासात घेतले. आपल्या पक्षात फूट पडली तेव्हा आपल्याला 40 आमदारा सोडून जाणार असल्याची माहिती आपल्याला होती, असे त्यांनी सांगितले.
ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांचा हात थरून त्यांना जबरदस्तीने थांबवून काय फायदा आहे. ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे आज नाही मात्र उद्या माझा आहे, असे देखील ते म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंचा पाच खासदार फूटत असल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या गोष्टीचे समर्थन केले. ते म्हणाले, राष्ट्रहितासाठी ही बाब होत असेल तर तिचे स्वागतच केले पाहिजे. कुठल्याही गैरमार्गाने असे होत नसेल तर ती चांगलीच बाब आहे. तर, शिंदेंच्या शिवसनेचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, ऑपरेशन टायगर राबवण्याची आम्हाला गरज नाही. एकनाथ शिंदेंनी कोणतीही बैठक घेतली नाही. मी अनेकवेळा सांगिते आहे की, पक्षात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन टायगर राबवण्याची गरज नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.