

Ahilyanagar News : नीट (NEET) फेरपरीक्षेच्या निकालानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जलालपूर येथील 19 वर्षीय अंकिता सुरेश सांगळे हिने अपेक्षित गुण न मिळाल्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत तिने परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे नैराश्य आल्याचा उल्लेख केला असून, आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे. कर्जत पोलिसांनी (Police) या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
अंकिता सुरेश सांगळे हिने 21 जून रोजी झालेली नीट फेरपरीक्षा (NEET Exam) दिली होती. या परीक्षेत तिला 166 गुण मिळाले होते. संबंधित प्रवेश प्रक्रियेसाठी कट-ऑफ 177 गुण असल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर ती मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेच्या दिवशी अंकिताचे वडील आणि भाऊ आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. घरात आई आणि अंकिता दोघीच होत्या. आई घरातील कामात व्यग्र असताना अंकिताने अभ्यासासाठी असलेल्या स्वतंत्र खोलीत गळफास घेतल्याचे सांगितले जाते. बराच वेळ तिची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने आईने खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत अंकिताने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याने नैराश्य आल्याचे तिने नमूद केले आहे. तसेच, "माझ्या आत्महत्येसाठी माझे आई-वडील, भाऊ किंवा इतर कोणालाही जबाबदार धरू नये," असेही तिने स्पष्टपणे लिहिले आहे.
या घटनेची कर्जत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. प्राथमिक पोलिस नोंदीमध्ये नीट परीक्षेचा स्वतंत्र उल्लेख नसल्याची माहिती समोर आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.