Shrikant Shinde Speech: खासदार शिंदेंच्या हिवाळी अधिवेशनात 3 मोठ्या मागण्या, मोदी सरकारनं मान्य केल्या, तर निवडणुकांचं गणितंच बदलणार

Parliment Winter Session 2025: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेंचं भाषण चांगलंच गाजलं.त्यांनी इंदिरा काँग्रेसवर टीकेची झोड उठवतानाच इंदिरा गांधींनाही लक्ष्य केलं.
Shrikant Shinde
Shrikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: लोकसभेचं संसदीय हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वंदे मातरम, एसआयआर, मतचोरी, निवडणूक आयोग यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांनी फैरी झडत आहे. पण याचदरम्यान,या हिवाळी अधिवेशनात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मंगळवारी(ता.9) लोकसभेत आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेंचं भाषण चांगलंच गाजलं.त्यांनी इंदिरा काँग्रेसवर टीकेची झोड उठवतानाच इंदिरा गांधींनाही लक्ष्य केलं. याचवेळी त्यांनी संसदेतील आपल्या भाषणात निवडणूक लढवण्याचं वय 25 वरून 18 किंवा 21 करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच लोकसभेतील निवडणूक सुधारणा चर्चेदरम्यान त्यांनी निवडणूक लढवण्याच्या वयासंदर्भातील प्रस्तावासह एक राष्ट्र,एक निवडणूक आणि एकल मतदारयादीची मागणी केली.

लोकसभेत निवडणुकीत सुधारणा करण्याविषयीच्या चर्चादरम्यान सत्ताधारी पक्षातील खासदारांकडूनही अनेक बदल सुचवले जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीविषयीच्या केलेल्या मागण्या जर केंद्र सरकारकडून मागण्या करण्यात आल्या तर निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. या बदलानंतर निवडणुका,उमेदवारी,मतदान प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे लोकसभेतील आपल्या भाषणात म्हणाले,आजच्याच दिवशी 9 डिसेंबरला 79 वर्षांआधी भारताची पहिली संविधान सभा झाली होती.त्यादिवशी त्यांच्यासमोर एकच लक्ष्य होतं की, असा भारत बनवला जावा जिथे जनता हीच जनार्दन असेल.1946 मध्ये चर्चा या गोष्टीवर झाली होती की, मतदानाचा अधिकार कुणाला मिळावा? आणि आज 2025 मध्ये चर्चा ही त्या मताचा सन्मान कशाप्रकारे सुरक्षित राहील? यावर सुरु असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

Shrikant Shinde
BJP Secret Files : भाजपच्या कारनाम्यांची 'सिक्रेट फाईल' उद्धव ठाकरेंच्या हाती; भ्रष्टाचार अन् पाच वर्षात..., वसंत मोरेंच्या दाव्याने खळबळ

शिंदे म्हणाले, इलाहाबाद कोर्टाने 1975 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द केली, तेव्हा त्या निर्णयाचा सन्मान करण्याऐवजी या देशाला आणीबाणी लावण्याचं काम काँग्रेसने (Congress) केलं. एवढंच नाही, आपली खुर्ची वाचवण्यासाठी संविधानाला बदलून टाकलं आणि कायदा आणला की,पंतप्रधानांच्या निवडीवर कोर्टात चॅलेंज दिलं जावू शकत नाही.ज्यांनी आपल्या सत्तेसाठी संविधानाचा गळा घोटला आज ते संविधानाची प्रत हातात घेऊन इथे नैतिकतेचे ढोंग करत आहेत", असा जोरदार हल्लाबोलही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.

तसेच ज्या काँग्रेसच्या कार्यकाळात मतदान पेट्यांवर अॅसिड टाकून मतपत्रिका जाळल्या जात होत्या. त्यांच्यासह काही राजकीय पक्षांचाही मतदारयादी पुनरीक्षण प्रक्रियेला देखील विरोध सुरू आहे. कारण त्यांना व्होट बँकेचं राजकारण करायचं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Shrikant Shinde
Eknath Shinde vs Ravindra Chavan : शिंदे–चव्हाणांमधील 'कोल्ड वॉर' कायम, एका मंचावर येऊनही संघर्षाची ठिणगी, म्हात्रे विरुद्ध म्हात्रे’ लढतीने टेन्शन वाढवले!

त्याच काँग्रेसनं बाळासाहेब ठाकरेंवर 6 वर्ष मतदान करण्यावर बंदी घातली होती. आता त्याच काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांची हातमिळवणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या घुसखोरांना मतदारयादीतून बाहेर काढण्यात अडचण आहे, कोण आहे, त्यांना व्होट बँकेचे राजकारण खेळायचं आहे' अशी विचारणाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com