Thackeray-Fadnavis Secret Deal : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिदेंची धडधड वाढवली; फडणवीसांसोबत सिक्रेट डील?

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत उच्चस्तरीय बैठक झाल्याचे सांगितले. या बैठकीत काय ठरले ते लवकरच समोर येईल, असे देखील ते म्हणाले.
Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यानंतर ते मैदानात उतरले आहेत. त्यांनी पहिल्यांदा ईशान्य मुंबईचा दौरा केला. आणि शुक्रवारी ते विदर्भ दौऱ्यासाठी निघाले होते. विशेष म्हणजे ते ज्या विमानाने नागपूरला गेले. त्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रवास करत होते.

या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दोघेही नेते एकाच विमानाने प्रवास करत होते. त्यामुळे हा योगायोग होता की ठरवून केलेला प्रवास या बद्दल देखील बोलले जात आहे. दरम्यान, ठाकरेंनी या बाबत माध्यमांशी संवाद साधताना खुलासा केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. कालच्या बैठकीत जे ठरले ते येत्या काही दिवसांत कळेल.' दरम्यान,ठाकरेंच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विमानापेक्षा इमान बरे म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचले.

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Uddhav Thackeray : 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला घाव 'भाजपच्या हिंदुत्वावर' : ‘भाजपमुक्त राम’ आंदोलनाची घोषणा

शिंदे काय म्हणाले?

शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे हुशार आहेत. त्यांनी 2019 ला पाहिलं आहे की, कपटी मित्र किती धोकादायक आहे. 2019 ला लोकांनी एकत्र प्रवास करण्याचं तिकीटं दिलं होतं. मात्र, ते काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर गेले. आता ते तेथे गटांगळ्या खात आहेत.

Uddhav Thackeray–Devendra Fadnavis Eknath Shinde
Eknath Shinde Video : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्रित विमान प्रवास, एकनाथ शिंदेंनी अखेर मौन सोडले, म्हणाले,...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com