Assembly Election Result 2023 : अहंकारी माणसाला तीन राज्यांतील जनतेने दिले उत्तर; खासदार विखेंची राऊतांवर टीका

Sujay Vikhe New : ते रोज सकाळी उठून टीव्हीसमोर येऊन भाजप महायुतीवर टीका करत होते.
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत मिळवलेल्या यशावर खासदार सुजय विखे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘प्रत्येक अहंकारी माणसाला उत्तर असून, दररोज सकाळी उठून महायुतीवर आरोप करत होते. पंतप्रधानांवर टीका करत होते. हा निकाल म्हणजे त्या टीकाकारांना जनतेचे सडेतोड उत्तर आहे', अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली आहे. (350+ MPs of 'NDA' will be elected to Lok Sabha : Sujay Vikhe)

तीन राज्यांतील यशानंतर नगर जिल्ह्यात भाजपकडून जल्लोष सुरू आहे. भाजप महायुतीत असलेले शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटदेखील या जल्लोषात सहभागी झाला आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी एकत्र येत जल्लोष केला. ढोल-ताशासह फटाके, पेढे वाटून आनंद साजरा केला. यानंतर भाजप खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe
Madhya Pradesh Election Result : अनपेक्षित...धक्कादायक... : पृथ्वीराज चव्हाण मध्य प्रदेशातील पराभवामुळे उद्‌विग्न

खासदार सुजय विखे म्हणाले की, हे प्रत्येक अहंकारी माणसाला उत्तर आहे. ते रोज सकाळी उठून टीव्हीसमोर येऊन भाजप महायुतीवर टीका करत होते. पैशाचा आरोप करत होते. पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर टीका करत होते, परंतु जनतेने दिलेला हा कौल त्याचे उत्तर आहे.

राजकारणामध्ये कोणत्याही आरोपाला उत्तर ही जनता देत असते. जनतेने या सर्व अहंकारी माणसांना या निकालातून सडेतोड उत्तर दिले आहे. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत देशात एनडीएचे 350 प्लस खासदार निवडून येतील आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. यात नगरमधील जनताही फार मोठा सहभाग नोंदवील. खासदार संजय राऊत यांच्या मनावर खूप परिणाम झालेला आहे. हा निकाल पहिल्यानंतर त्यांना फार मोठे दुःख झालेले आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थन करतो, असेही विखे यांनी म्हटले आहे.

Sujay Vikhe
Madhya Pradesh Election Result : कमलनाथांच्या अहंकाराने काँग्रेसचा पराभव केला; इंडिया आघाडीतील मित्रपक्षाने डागली तोफ

खासदार विखेंची पुन्हा टोलेबाजी

खासदार सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांवर नगर तालुक्यातील एका कार्यक्रमातून जोरदार टीका केली होती. कोण कोणाच्या चादरीत आहे, हे व्हिडिओसह माझ्याकडे आहे. हे व्हिडिओ भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे देणार असून, त्यांनी ठरवायचे आहे, ते कधी बाहेर काढायचे? यावर खासदार विखे यांनी पुन्हा टोलेबाजी केली.

Sujay Vikhe
Chhattisgarh Election Result 2023 : कलेक्टरची नोकरी सोडली; पण पहिल्याच निवडणुकीत हार...आता 'सीएम'साठी नाव चर्चेत!

राजकारणात सगळेच मित्र आहेत. परंतु राजकारणात जसे घडेल, तसे निर्णय घ्यायचे असतात. राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टी सांगायच्या नसतात. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. आज ते महत्त्वाचे नाही. राज्यात भाजपच्या विजयाचा आनंदोत्सव सुरू आहे. परंतु ज्या लोकांना याविषयी काय वाटत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावे. त्यांनी ठरवून घ्यावे, असे खासदार सुजय विखे म्हणाले.

Sujay Vikhe
Chhattisgarh Election Result 2023 : छत्तीसगडमधील सीतापूरमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com