शिक्षणमंत्री केसरकरांची पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा; शालेय विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन...

Deepak Kesarkar : शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे बघण्याचे आवाहन
Deepak Kesarkar Latest News
Deepak Kesarkar Latest Newssarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज (ता.२६ ऑक्टोबर) शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्या देखील मोफत मिळणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री केसरकरांनी केली आहे. ते सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. (Deepak Kesarkar Latest News)

काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद होत असल्याबाबत वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी आणि अतिरिक्त शिक्षक यांची माहित घेवून त्यानंतर तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल, असे त्यांनी म्हटले होते. आता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

याआधीच त्यांनी यासंदर्भातील आपले विचार व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांना आपल्या मुलांसाठी वही घेणे कठीण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्यादृष्टीने सूचना करण्याचे केसरकरांनी म्हटले होते. तसेच, राज्यातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी या उपक्रमकडे बघण्याचे आवाहन त्यांनी केले होते. आता त्यांनी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे गटात गेल्यावर केसरकरांना पहिल्याच मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यानंतर केसरकरांकडून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक निर्णय घेण्याकडे कल दिसून येत आहे. आता त्यांनी केलेल्या या घोषणेची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com