Ahmednagar News : परवानगी नसलेला फलक उतरविताना छत्रपतींच्या चित्राचा अवमान, महापालिका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

AMC Crime News : अनधिकृत फलक असल्यानेच महापालिका कर्मचारी कारवाई करत होते.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : महापालिकेची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या चित्राचा लावलेला फलक काढताना महापालिका कर्मचाऱ्यांकडून अवमान झाल्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी महापालिका कर्मचारी सागर जपकर याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर पानटपरी चालकाने सुपारी देऊन हल्ला केला. या घटनेनंतर नगर शहरात अवैध टपरी आणि फलकांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. यात सावेडीतील प्रोफेसर कॉलनी येथे महापालिका कर्मचारी अनधिकृत फलकांवर कारवाई करत होते.

Ahmednagar News
Rohit Pawar News : रोहित पवारांच्या अडचणी वाढणार ? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ 'बारामती ॲग्रो'वरून पुन्हा आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांचे(Chhatrapati Shivaji Maharaj) चित्र असलेला फलक काढताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अवमान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही युवकांनी याचा व्हिडिओदेखील काढला आहे. याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भारतीय जनता पक्षाचे(BJP) शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी तोफखाना पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली.

Ahmednagar News
Raosaheb Danve Watched The Kerala Story: चारशे महिलांसोबत दानवेंनी पाहिला `द केरळा स्टोरी`, सेल्फीही दिल्या..

तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन रणदिवे यांच्याशी हिंदुत्ववादी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. पोलिस अधिकाऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर गुन्ह्याची नोंद घेतली. बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, महापालिकेची परवानगी न घेता हा फलक लावला गेला होता, हे तोफखाना पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. अनधिकृत फलक असल्यानेच महापालिका कर्मचारी कारवाई करत होते. यातून महापुरुषांचा छायाचित्राचा अवमान झाला. परिणामी महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा(Crime) दाखल झाला.

परंतु, अनधिकृत फलक ज्यांनी लावला त्याविरोधात तक्रार देण्यासाठी महापालिका समोर आली नाही. नगर महापालिका कर्मचारी युनियन याची दखल घ्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होऊ लागली आहे. यातून पुन्हा महापालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटना संघर्ष होणार, असे दिसते .

(Edited By Deepak Kulkarni)

Ahmednagar News
Satara Political News : वाघनखांबाबत उदयनराजेंचे महत्त्वपूर्ण विधान; माझा जन्मच झाला नव्हता...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com