Prahlad Patil - Karad Passed Away : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे निधन

Nashik News : १९८२ सालापासून शरद जोशी यांच्यासोबत शेतकरी संघटनेच्या चळवळीत त्यांचे महत्वाचे योगदान राहिले.
Prahlad Patil - Karad
Prahlad Patil - Karad Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे रविवारी(ता.१६) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या ८ दिवसांपासून नाशिक येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या तीन वर्षात त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते राजकारण व समाजकारणात सक्रिय नव्हते. निफाड साखर कारखान्याचे अध्यक्ष, तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष, न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक विश्‍वस्त आदींसह विविध पदे भूषविली.

प्रल्हाद पाटील कराड(Prahlad Patil Karad) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक त्यांनी लढविली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ते कोरोनाबाधित झाले. मात्र, इच्छाशक्तीच्या बळावर वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी मात केली होती. जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या पश्चात सहा मुले,दोन मुली,सुना नातवंडे,पणतू असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील तारा निखळला अशी भावना शेतकरी संघटने ज्येष्ठ नेते व माजी प्रांताध्यक्ष रामचंद्र बापू पाटील यांनी व्यक्त केली.

Prahlad Patil - Karad
Ajit Pawar News : मुख्यमंत्री बोलत असताना अजित पवारांच्या हातवाऱ्यांनी वेधले लक्ष; म्हणाले...

'प्रगतशील शेतकरी’ म्हणूनही प्रल्हाद पाटील यांची ओळख होती. माळरानावर शेती पिकवण्याचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणले होते. जळगाव (ता.निफाड) हे त्यांचे मुळगाव होते. १९४२ च्या ‘चले जाव’चळवळीकडे ते आकृष्ट झाले.ते नंतर तरुणाईत ‘राष्ट्र सेवा दला’त सक्रिय होते.राजकीय वाटचालीत समाजवादी पक्षात सक्रिय होते.

शेतकऱ्यां(Farmer Leader)च्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली.त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला होता.१९५६ ते १९६५ या कालावधीत निफाड तालुका डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष होते,तर १९६२ ते १९७२ या काळात जिल्हा परिषद सदस्य होते.त्यांनी ‘जिल्हा मध्यवर्ती बँके’चे संचालकपद भूषवले आहे आणि ते ‘शासकीय इरिगेशन कमिटी’चे सदस्यही होते.समविचारी मित्रांना सोबत घेऊन १९६२ झाली माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

Prahlad Patil - Karad
Devendra Fadnavis On Opposition Parties : फडणवीसांचा अधिवेशनाआधीच विरोधकांवर हल्लाबोल ; म्हणाले,'' एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि...''

१९८२ सालापासून शरद जोशी(Sharad Joshi) यांच्यासोबत शेतकरी संघटनेच्या चळवळीत त्यांचे महत्वाचे योगदान राहिले. शेतकरी माधवराव बोरस्ते,माधवराव मोरे व प्रल्हाद पाटील कराड हे निफाड तालुक्यातील नव्हे तर राज्यभरात शेतकरी संघटनेचे त्रिमूर्ती म्हणून ओळखले जायचे.पहाडी भाषणामुळे त्यांना राज्यभरात शेतकरी संघटनेची बुलंद तोफ म्हटले जायचे.

सोमवारी (दि.१७) रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जळगाव येथील ग्राम संस्कार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com