

CM Eknath Shinde News : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार (ता.१६ जुलै) पासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी केलेल्या हातवाऱ्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले.
पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलायला सुरुवात केली. राज्यात गुंतवणूक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षाला विषयच माहिती नाही, पत्राऐवजी ग्रंथच लिहिला आहे, असा चिमटा काढला. त्यानंतर माईक अजित पवारांकडे (Ajit Pawar) दिला. अजित पवारांनीही त्यांच्या रोखठोक शैलीमध्ये प्रामुख्याने चार-पाच मुद्देच मांडले. ते म्हणाले, सभागृहात सत्ताधारी पक्षाची उपस्थिती ठेवणे, आयुधांचा वापर करुन योग्य पद्धतीने काम करण्यावर आमचा भर राहील.
तसेच लोकशाही आम्हाला माहित आहे. सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाचे म्हणावे तसे प्रमाण नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडला तर बळीराजा समाधानी राहिल. उत्तरात थातूर मातून सांगण्याच काम सत्ताधारी पक्षाकडून होणार नाही. आम्ही विरोधकांना व्यवस्थितपणे उत्तर देण्याच काम करु, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी वरील मुद्दे मांडत सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे दिला. मुख्यमंत्र्यानी सरकारने केलेल्या अनेक कामांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे भाषण थोडेसे लांबले. मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना मध्येच पत्रकारांमधून एकाने म्हटले की...अंतिम आठवडा प्रस्ताव वाटतोय, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातवारे करत सुंदर असे म्हटले. त्यामुळे अजित पवार यांच्या या कृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधले.
त्यानंतर पुन्हा शिंदे यांनी पुढील मुद्दे मांडेल, ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या पैशात वाढ केली. आम्हीफक्त आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेत नाही, आम्ही जनतेच्या कुटुंबाची जबाबदारी ही घेतो, असे सांगत त्यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. केंद्रातून राज्याची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी मदत दिली जाणार आहे. पायाभूत सुविधाही सक्षम आपण करतोय. त्यात ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड यामुळे प्रवास सुखकर होईल. समृद्धी हायवेलाही आम्ही ३३ लाख झाडे लावतोय, मोदींच्या हस्ते भविष्यात अन्यही प्रकल्पाचे उद्घाटन केले जाईल, अशा अनेक राज्य सरकारच्या प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.