Devendra Fadnavis On Opposition Parties : फडणवीसांचा अधिवेशनाआधीच विरोधकांवर हल्लाबोल ; म्हणाले,'' एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि...''

Maharashtra Monsoon Session 2023 : '' विरोधी पक्षाला विषयच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी पत्राऐवजी एक ग्रंथ दिला आहे... ''
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : '' विधानसभा हे लोकशाहीचे प्रतीक आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी येतील त्या विषयांवर चर्चा करण्याची सत्तारुढ पक्षाची तयारी आहे. जास्तीत जास्त लोकहिताचा विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू. मात्र, अजूनही विरोधी पक्ष lत्यांच्या मानसिकतेतून बाहेर निघालेला नाही. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीने निर्माण केलेल्या संस्थांनी ज्या सरकारला कायदेशीर ठरवलं आहे. त्या सरकारला बेकादेशीर आणि असंवैधानिक म्हणायचं, हे अत्यंत चुकीचं आहे '' अशी टीकेची तोफ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांवर डागली आहे.

पावसाळी अधिवेशनाला सोमवारी (दि. १७ ) सुरुवात होणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तीनही नेत्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, '' पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानासाठी निमंत्रित केलं होतं. पण, नेहमीप्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाकडून एक पत्र आम्हाला देण्यात आलं आहे. मात्र, विरोधी पक्षाला विषयच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी पत्राऐवजी एक ग्रंथ दिला आहे '' असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : अजित पवार गट तडकाफडकी पवारांच्या भेटीला ; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...

विरोधकांचा 'तो' आरोप फेटाळला...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, आमचं सरकार सत्तेत आल्यावर उद्योग पळवण्यात आल्याचे आरोप केले गेले. पण, हे सरकार आल्यानंतर परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. २०२० आणि २०२१ मध्ये कर्नाटक तर २०२१ आणि २०२२ मध्ये गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला होता. आता पुन्हा २०२२ आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आला आहे असं स्पष्ट मत व्यक्त करत फडणवीस विरोधकांचे उद्योग पळवण्याचा जो आरोप फेटाळून लावला. (Maharashtra Monsoon Session)

'' आमची ताकद वाढली, पण...''

'' ज्या गोष्टी अधिवेशनात मांडल्या जातील त्या सर्व गोष्टींवर आमची चर्चा करण्याची तयारी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आमची ताकद वाढली असून याचा आम्ही कोणताही दुरुपयोग करणार नाही. तसेच आता आम्ही लोकहिताचे निर्णय घेणार '' असल्याचा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Devendra Fadnavis
Hasan Mushrif on Sharad Pawar : शरद पवार काय त्यांच्याकडच्या नेत्यांबाबत शब्दही काढणार नाही ; मुश्रीफांचे सूचक विधान

आम्हांला शरद पवारां(Sharad Pawar)नी राज्याचा शिक्षण दर्जा घसरला असल्याचं पत्र लिहिलं. पण राज्याचा शिक्षण दर्जा घसरला नाही. मूल्यांकनामध्ये पहिल्या पाच श्रेणीत कुठलीच राज्य नाहीत. त्यामध्ये महाराष्ट्रही दुसऱ्या क्रमांकावर आहे असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांना यावेळी दिलं.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com