Advay Hire Politics: अद्वय हिरे यांना दुसरा धक्का, संचालक पद झाले रद्द

Advay Hire; Dada bhuse given political shock to Hire APMC director post cancel-मालेगाव बाजार समितीचे संचालक अद्वय हिरे यांचे संचालक पद सहकार निबंधकांनी रद्द केले.
Adway Hire & Dada Bhuse
Adway Hire & Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Bhuse Vs Hire: शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दुसरा धक्का बसला आहे. त्यामुळे हिरे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यानिमित्ताने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्या आणखी एका विरोधकाला कडक इशारा दिला.

मालेगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाचे नेतृत्व अद्वय हिरे करतात. गेल्या निवडणुकीत हिरे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले होते. त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पॅनलचा पराभव केला होता. मात्र आता हिरे यांना धक्का बसला आहे.

Adway Hire & Dada Bhuse
Girish Mahajan Politics: खानदेशच्या राजकारणात भाजप आणि गिरीश महाजन यांचेच वर्चस्व!

तांत्रिक मुद्द्याचा आधार घेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे समर्थक मानले जाणारे बाजार समितीचे संचालक धर्मा नारायण शेवाळे यांनी हिरे यांना चांगलाच झटका दिला आहे. बाजार समितीच्या मासिक बैठकांना सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांचे संचालक पद रद्द करावे यासाठी शेवाळे यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.

Adway Hire & Dada Bhuse
Manikrao Kokate : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात कोकाटेंचे जंगी स्वागत; म्हणाले, "माझ्यावरही अन्याय झाला..."

जिल्हा सहकार उपनिबंधक फय्याज मुलानी यांनी याबाबत सुनावणी घेतली. गेले वर्षभर हिरे बाजार समितीच्या बैठकांना गैरहजर होते. याबाबत झालेल्या सुनावणीत हिरे यांच्या विरुद्ध असलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यात हिरे यांना यश आले नाही.

नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्यात ते यशस्वी झाले नाही. त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी घेतला आहे.

शिवसेनेचे उपनेते असलेले हिरे यांना हा मोठा धक्का मानला जातो. तालुक्यात हिरे विरुद्ध शिक्षण मंत्री भुसे यांच्यात राजकीय वाद आहे. हिरे यांच्या विरोधात दाखल असलेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी हिरे यांना अटक केली होती. या कालावधीत ते वर्षभर कारागृहात होते.

यासंदर्भात त्यांनी स्वतः गैरहजर राहण्याचे कारण देऊन परवानगी घेण्यासाठी अर्ज देणे अपेक्षित होते. मात्र तसा अर्ज देण्यात आला नाही, असा बाजार समितीच्या सचिवांचा दावा आहे. त्या आधारे सहकार उपनिबंधकांनी निकाल दिला.

श्री हिरे यांनी मात्र आपण आपल्या व्यक्तीमार्फत असा अर्ज दिला होता असा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात बाजार समितीच्या संचालक पदावरून हिरे आणि सहकार विभागात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

मालेगाव बाह्य मतदार संघात शिक्षण मंत्री दादा भुसे सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना उपनेते अद्वय हिरे आणि दादा भुसे यांच्यात लढत झाली. त्यात शिक्षण मंत्री भुसे मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे हिरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्या पाठोपाठ बाजार समितीचे संचालक पद रद्द झाल्याने हिरे यांना हा दुसरा राजकीय धक्का मानला जातो.

तालुक्याच्या राजकारणात दादा भुसे यांनी आता आपली पकड अधिक घट्ट केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचे विरोधक कोमात गेल्यासारखी स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत भुसे यांनी पुन्हा एकदा मतदार संघावरील आपले वर्चस्व सिद्ध केल्याने हिरे आणि भुसे राजकारणात हिरे यांना दुसरा झटका बसला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com