Shevgaon News: शेवगावमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी, दोषींवर कारवाई होणार; पालकमंत्री विखे पाटलांचा इशारा

Radhakrishna Vikhe-Patil on Shevgaon Violence : राधाकृष्ण विखे पाटील आज शेवगाव शहराला भेट देणार आहेत.
Radhakrishna Vikhe-Patil
Radhakrishna Vikhe-PatilSarkarnama

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये रविवारी रात्री दोन गटांत राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारावरून शेवगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेची दखल नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली असून या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अकोल्याच्या पाठोपाठ अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा झाल्यामुळे राजकारण तापलं आहे. शेवगावमध्ये झालेल्या या घटनेत चार पोलीस जखमी झाले असून वाहनांची आणि दुकांनांचीही तोडफोड करण्यात आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

शेवगावमध्ये घटलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरु केले असून सध्या शेवगावात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी पोलिसांनी 30 ते 35 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Radhakrishna Vikhe-Patil
Ahmednagar Violence: संभाजी महाराजांच्या मिरवणुकीत दोन गटात तुफान राडा; अकोला पाठोपाठ अहमदनगरमध्ये हिंसाचार

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "शेवगावमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा घटना घडतील त्या पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाईल. शहरात शस्त्र येतात पण हे पोलीस प्रशासनाला कसं माहित होत नाही?", असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. राधाकृष्ण विखे पाटील हे आज दुपारी शेवगावला भेट देणार आहेत.

Radhakrishna Vikhe-Patil
Devendra Fadnavis on Shevgaon Violence : शेवगाव येथील राड्यानंतर गृहमंत्री फडणवीस 'अॅक्शन मोड'मध्ये, दिला 'हा' गंभीर इशारा

दरम्यान, शेवगावच्या घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली. यावेळी ते म्हणाले, "राज्यात काही लोक जाणूनबुजून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवून देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार", असा इशारा फडणवीसांनी दिला.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com