

Ahilyanagar Sandeep Thorat Fraud : अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्थेतील ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संदीप थोरात यांचा नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होते.
संदीप थोरात यांना दम्याचा त्रास होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांचा दम्याचा त्रास वाढल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप थोरात हे सह्याद्री मल्टिस्टेटचे संस्थापक होते. त्यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी कारवाई झाली होती. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. गेल्या चार महिन्यांपासून त्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात (nashik central jail) ठेवण्यात आले होते. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना दम्याचा त्रास होता.
थोरात यांचा दम्याचा त्रास वाढल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.
संदीप थोरात यांच्यावर गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होता. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे शेअर मार्केट आणि इतर व्यवसायात गुंतवले जातील असे सांगून, दरमहा 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. लोकांकडून त्यांनी कोट्यावधींच्या ठेवी जमा केल्या होत्या. प्रत्यक्षात जेव्हा गुंतवणूकदार पैसे मागण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना धमकावण्यात आले किंवा टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप होता.
त्यानंतर अनेक ठेवीदारांनी थोरात यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अहिल्यानगर पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत होती. या फसवणुकीच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
दरम्यान, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजारावर सुरु असलेल्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने आर्थिक फसवणूक प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळालं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय होणार? या प्रकरणाचा पुढील तपास कसा पुढे जाणार असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.