Ahilyanagar DCC bank election : मोठी राजकीय घडामोड! राम शिंदे, विखे, थोरात, लंके एकत्र; अहिल्यानगर जिल्हा बँक बिनविरोध होणार?

Ram Shinde, Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat and Nilesh Lanke meet amid efforts Ahilyanagar district bank election unopposed : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक; नाराजी आणि स्वतंत्र पॅनलच्या चर्चेनंतर निर्णयाकडे लक्ष.
Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar District Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar political news : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना समोर आली आहे. सर्वपक्षीय कट्टर प्रतिस्पर्धी राजकीय विरोधक एकत्र आले आहेत.

भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यासह आजी-माजी आमदार-खासदार हे एकत्र आले. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगृहावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात ही बैठक दुपारी सुरू झाली. या बैठकीबाबत गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात चर्चा सुरू होती. सभापती प्रा. राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. राम शिंदे यांनी थेट मंत्री विखे पाटील यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. नीलेश लंके यांनी 'थांबा आणि पाहा', असे म्हणत स्वतंत्र पॅनलची तयारीचे सूचक संकेत दिले होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचेही समोर आले.

राम शिंदे या बैठकीपूर्वी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या भेटीला आज नेवासा येथे होते. त्यानंतर त्यांनी या बैठकीला हजेरी लावली. माजी मंत्री शंकरराव गडाख अन् शिंदे एकत्र होते. बैठक सुरू होण्याच्या काही क्षण अगोदर खासदार नीलेश लंके आले. त्यांनी थेट मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या शेजारील खुर्चीवर बसले.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी थोरात-लंके एकत्र येईनात? राम शिंदेंच्या हालचालींनी वाढवली उत्सुकता

सभापती प्रा. राम शिंदे सर्वात मध्यभागी, त्यांच्या उजव्या हाताला पालकमंत्री विखे पाटील, डाव्या हाताला थोरात अन् खासदार लंके मंत्री विखे पाटील यांच्या शेजारी बसले होते. जिल्हा बँकेच्या निमित्ताने, जिल्ह्यातील सर्व विरोधक एकत्र आल्याने बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक यशस्वी होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पण नाराज विरोधकांची अन् इच्छुकांची संख्या पाहाताच, बैठकीतील निर्णय काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Ahilyanagar District Bank Election
Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदे पुन्हा गडाखांच्या भेटीला; अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय घडणार?

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी उद्या 21 तारखेचा महत्त्वाचा दिवस आहे. अर्ज माघारी घेण्याच्या हालचाली वेगाने होतील. त्यानंतर बँकेची निवडणूक लागले. तत्पूर्वी या बैठकीला खूप महत्त्व आले आहे. बंद दाराआड सर्वपक्षीय नेते, आमदार-माजी आमदार, खासदार-माजी खासदार एकत्र आले आहे. विशेष म्हणजे, थोरातांकडील बैठकीत एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते नव्हते. त्यांनी लगेचच स्वतंत्र बैठक घेतली होती. पण आताच्या बैठकीत, एकनाथ शिंदे शिवसेनेचे स्थानिक नेते देखील सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com