Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री; थोरातांच्या बिनविरोध प्रयत्नांना धक्का?

Eknath Shinde Shivsena fields three candidates in Sangamner, intensifying the Ahilyanagar District Bank election battle : बाळासाहेब थोरातांच्या बिनविरोधाच्या प्रयत्नांना शिंदे शिवसेनेचे आव्हान; अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, सदाशिव लोखंडेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
Eknath Shinde Shivsena
Eknath Shinde ShivsenaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीच्या वाटाघाटींवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला डावलून जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेता येणार नाही, असा थेट संदेश जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, माजी खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून संगमनेर तालुक्यातून तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्या संगमनेरमधून बैठकीला सुरुवात केली, त्याच संगमनेरमधून शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अर्ज दाखल करण्यात आले.

शिवसेनेच्या (Shivsena) या भूमिकेकडे बाळासाहेब थोरात यांच्या बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना दिलेले राजकीय आव्हान म्हणून पाहिले जात आहे. विशेषतः बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षित स्थान न मिळाल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते.

Eknath Shinde Shivsena
Vikhe Thorat ADCC Bank seat sharing : अहिल्यानगर जिल्हा बँकेचा आज फैसला; 7 जागांवर विखे-थोरातांचा तिढा, जगतापांची भूमिका निर्णायक?

बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा करत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना, महायुतीने आपल्या प्रमुख नेत्यांना गृहीत धरायला हवे होते, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला.

Eknath Shinde Shivsena
Ahilyanagar DCC Bank President : अहिल्यानगर जिल्हा बँकेत सुजय विखेंची एंट्री; अध्यक्षपदाची चर्चा, बिनविरोध फॉर्म्युल्यावर ठरणार फैसला

शिवसेनेचे तीन उमेदवार रिंगणात

याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेकडून संगमनेर तालुक्यातून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेती सहकारी संस्था मतदारसंघातून निमज येथील बादशाह दत्तू गुंजाळ, शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातून मंगळापूर येथील शंकर मारुती वाळे, तर अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून पंढरीनाथ माधव इल्हे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

शिवसेना जिल्हा बँकेला आव्हान उभे करणार

शिवसेनेची रणनीती केवळ संगमनेरपुरती मर्यादित राहणार नसून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी पक्षाने केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकारातील प्रस्थापित नेत्यांसमोर शिवसेनेचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला वाटाघाटीत किती जागा?

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना शिवसेनेच्या या भूमिकेमुळे नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेला वाटाघाटीत किती जागा मिळतात आणि पक्षाची पुढील भूमिका काय राहते, यावर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष निवडणूक रंगणार, हे स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com