Cooperative Bank Elections : सहकारात ‘पॉवर गेम’ सुरू! जिल्हा बँक, तीन साखर कारखाने अन् 153 संस्थांच्या निवडणुकांच्या जोरदार हालचाली

Ahilyanagar District Cooperative Bank, Newasa Mula, Shevgaon ghule & Pathardi Vridheshwar Sugar Factories Election Process Begins : अहिल्यानगर जिल्हा बँक, तीन सहकारी साखर कारखाना आणि 153 सेवा संस्थाच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Ahilyanagar cooperative election news
Ahilyanagar cooperative election newsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar cooperative election news : नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुकानंतर आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असे वाटत असतानाच, आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे सहकाराचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा ढवळून निघणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारांचे वर्चस्व आणि जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह नेवासा इथल्या मुळा, शेवगावमधील लोकनेते मारूतराव घुले, पाथर्डीमधील वृद्धश्‍वेर या तीन सहकारी साखर कारखान्यांसह 153 सेवा संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे.

अहिल्यानगरमधील जिल्हा बँकेला मतदार यादी तयार करण्याचे आदेश सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. सध्या बँक राज्यातील सत्ताधारी भाजप (BJP) आणि अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. सहकार विभागाच्या आदेशानुसार जिल्हा बँक प्रशासनाकडून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना मतदानासाठी ठराव करावा लागणार असून त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला राज्य सरकारने (Government) स्थगिती दिली होती. मात्र आता ही स्थगिती उठविण्यात आल्याने जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेसह नेवाशातील मुळा, शेवगावमधील लोकनेते मारूतराव घुले आणि पाथर्डीमधील वृद्धश्‍वेर या तीन सहकारी साखर कारखान्यांसह 153 सेवा संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहे.

Ahilyanagar cooperative election news
Ajit Nawale Kisan Sabha Long March : ‘शेतकरी संप’ विसरू नका! आता कष्टकरी रस्त्यावर; विखेंच्या लोणीतून उठणार बंड, अजित नवलेंचा थेट इशारा

जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत 20 फेब्रुवारीलाच संपुष्टात आली. ही मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होते. मात्र राज्य सरकारने यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबवणीवर गेल्या. परंतू आता या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने सहकार खात्यात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

Ahilyanagar cooperative election news
Malegaon Mahapalika News: महापालिकेत नमाज पठण प्रकरणी विद्युत अभियंता निलंबित; प्रशासनाकडून गंभीर दखल

जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता

जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागा असून त्यात 14 जागा या सेवा सोसायट्यांसाठी आहेत. जिल्हा बँकेत सुरवातीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची सत्ता होती. परंतु राज्यात महायुतीचे सरकार येताच, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा बँकेत सत्तांतर घडवून आणले. भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीची जिल्हा बँकेवर सत्ता आहे.

सेवा सोसायट्यांच्या ठरावावर लक्ष

आता निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघणार आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना आता मतदानासाठी ठराव द्यावा लागणार आहे. त्यामुळे ठराव कोणला मतदान करण्याचा अधिकार देते. यावर निवडणुकीचे गणित ठरते. सहकार खात्याने बँकेला मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. सोसायट्यांना ठराव देण्यासाठी महिनाभराची मुदत आहे.

या तीन कारखान्यांच्या निवडणुका

याशिवाय तीन सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची चिन्हं आहेत. नेवाशातील मुळा सहकारी साखर कारखाना, शेवगावमधील लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर कारखाना आणि पाथर्डीमधील वृद्धश्‍वेर सहकारी साखर कारखाना यांची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

कारखान्यांच्या मतदार याद्या...

मुळा कारखान्याची मुदत 18 जानेवारी, ज्ञानेश्‍वर कारखान्याची मुदत 20 जानेवारी तर वृद्धश्‍वेर कारखान्याची मुदत 28 जानेवारीला संपुष्टात आली आहे. संस्था सभासद व व्यक्तिगत सभासद हे दोन मतदार या कारखान्यांसाठी आहेत. पुढील आठवड्यात मतदार यादी करण्याचे सांगण्यात येणार असून त्यासाठी 25 दिवसांचा कालावधी राहणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून प्रलंबित आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com