

Ahilyanagar Extortion Case: हिंदुत्ववादी कार्यक्रमात आक्रमक भूमिका घेणारा वकील, याचा खंडणीचा चेहरा समोर आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना तसंच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी लागोपाठ वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अॅड. हर्षल चावला, असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा शासकीय रूग्णालयात नोकरीसाठी अर्ज देण्यास आलेल्या एका डॉक्टर युवतीचा पाठलाग करून, तिचे आणि तिच्या बहिणीचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी डॉक्टर युवतीच्या फिर्यादीवरून अॅड. हर्षल चवाला याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात विनयभंग, खंडणीचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हा (Crime) दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पीडित डॉक्टर युवती सावेडी उपनगरात राहते. जिल्हा शासकीय रूग्णालयात जिल्हा शल्सचिकित्सक यांच्या कार्यालयासमोर नोकरीचा अर्ज देण्यासाठी आल्या होती.
यावेळी हर्षद चावला याने त्यांचा पाठलाग केला. पीडितेने विचारणा केली असता, त्याने आपण वकील असून राजकीय लोकांशी संबंध असल्याचे सांगितले. फिर्यादी युवती आणि तिच्या डॉक्टर बहिणीचे खासगी व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून ते सार्वजनिक करण्याची धमकी त्याने दिली.
या व्हिडिओच्या बदल्यात अॅड. हर्षल चावला याने पीडितेकडे दोन लाख रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याची आणि दोन्ही बहिणींचे वैद्यकीय क्षेत्रातील करिअर संपवून टाकण्याची धमकी त्याने दिली. वारंवार पाठलाग करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत.
अॅड. हर्षल चावला याचा हा कारनामा समोर येताच, आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालक अमरीश माणिकराव मानकर (मूळ रा. रचना कॉलनी, गोरक्षण रस्ता, ता. जि. अकोला, हल्ली रा. एअर पोर्ट रोड चिखलठाणा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना धमकावत दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.
कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी हर्षल चावला याच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंदवला. किरण शिवाजी राऊत (रा. कोल्हार खुर्द, ता. राहाता), संदीप भास्कर भगत (रा. बाह्यवळण रस्ता, शेंडी, ता. अहिल्यानगर) आणि ॲड. हर्षद चावला (रा. सावेडी) विरुद्ध गुन्हा केला आहे.
किरण राऊत, संदीप भगत आणि हर्षद चावला हे सहा एप्रिलला विनापरवाना कार्यालयात घुसले. राऊत याने ‘तुम्हाला मी वेळोवेळी सांगून सुध्दा तुम्हाला समजत नाही का? आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, तुम्ही आम्हाला ओळखले नाही.
तुम्हाला जर काम करायचे असेल, तर आम्हाला दरमहा 50 हजार रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाहीत, तर आम्ही तुमच्याकडे पाहून घेऊ’, असे धमकावले. यानंतर आठ एप्रिलला पुन्हा राऊत आणि भगत कार्यालयात आले आणि पैशांची विचारणा करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला, तसेच किरण राऊत याने फोनवरून कंत्राटदारांची बिले न काढण्याची धमकी दिली होती.
हर्षल चावला याला पोलिसांना अटक केली आहे. पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तेथून न्यायालयीन कोठडी सुनावल्यास, त्याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार आहे.
कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. यातच हर्षल चावला पोलिसांना आपल्या राजकीय संबंधांची वेळोवेळी जाणिव पोलिसांना करून देतो आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.