Birth Certificate Scam : बोगस जन्म प्रमाणपत्रांचा मुद्दा गाजत असतानाच सत्ताधारी भाजपच्या नगरपरिषदेत मोठी कारवाई, लाचखोर दोन कर्मचाऱ्यांना अटक

Jamkhed municipal employees arrested for bribery : राज्यभर बोगस जन्म-जात प्रमाणपत्रांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोहिम हाती घेतली आहे. या प्रकरणांचा तपास करत छडा लावण्यासाठी राज्य सरकारने देखील एसआयटीची स्थापना केली आहे.
Birth Certificate Scam
Birth Certificate Scamsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात अटक

  2. जन्म दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप

  3. किरीट सोमय्यांच्या बोगस प्रमाणपत्र दाव्यानंतर राज्यात खळबळ

maharashtra crime news : राज्यभर मोठ्या प्रमाणात बोगस जन्म-जात प्रमाणपत्रांच्या संदर्भात अनेक घटना समोर येत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील बोगस जन्म-जात प्रमाणपत्रांच्या संदर्भात मोहिम हाती घेत नुकताच मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी मुंबई महापालिकेतून तब्बल ८७ हजार ३४७ बेकायदा जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा दावा केला. ज्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे.

अशातच आता भाजपच्या ताब्यात असणाऱ्या अहिल्यानगरमधील जामखेड नगरपरिषदेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून जन्म दाखल्यासाठी त्यांनी ३ हजारांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे.

अहिल्यानगरमधील जामखेड नगरपरिषदेतील जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील लिपिक अभिजित जालिम भैसडे (वय ३९), अग्निशामक दलातील कंत्राटी मदतनीस अहमद इलियास शेख (वय ४३) यांनी मुलांचा जन्म दाखला मिळण्यासाठी ३ हजारांची लाच घेतल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Birth Certificate Scam
Crime News : भोंदू बाबा मनोहर भोसलेला मदत करणे पोलीस नाईकला भोवलं, मोबाईल दिला अन् थेट निलंबित, कारवाईने पोलिस दलात खळबळ

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २६ नोव्हेंबर २०२५ ला जामखेड नगरपरिषद येथे मुलगा व मुलगी यांचे जन्म दाखला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र जोडून तक्रारदारांनी अर्ज दिला होता. त्यासाठी लिपिक भैसडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी भैसडे यांनी मदतनीस शेख यांना संपर्क करण्यास सांगितले. शेख यांना संपर्क केला असता जन्मदाखला देण्याकरिता तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.

ज्याची तक्रार ५ मे रोजी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीवरून बुधवारी (ता.६) सापळा रचण्यात आला. यावेळी शेख याला जामखेड नगरपरिषदेसमोर तक्रारदाराकडून पंचासमक्ष तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

Birth Certificate Scam
Nashik Crime News : नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान ; गेल्या महिनाभरापासून फरार, शोधूनही सापडेना..

FAQs :

1. जामखेडमध्ये काय प्रकार उघडकीस आला
जन्म दाखल्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला

2. किती कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली
दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे

3. किती रुपयांची लाच मागितली होती
तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे

4. किरीट सोमय्या यांनी काय दावा केला होता
मुंबईत 87 हजारांहून अधिक बेकायदा जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा दावा केला होता

5. या प्रकरणामुळे काय चर्चा सुरू झाली आहे
राज्यात बोगस जन्म आणि जात प्रमाणपत्रांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com