Solapur Crime News : भोंदू बाबा भोसलेला मदत करणारं पोलीस नाईकला भोवलं, पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई

Police Constable Suspended In Fake Baba Manohar Bhosale Case : सोलापूरमधील स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर भोसले या भोंदूबाबावर फसवणूक आणि महिलांच्या अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Manohar Bhosale
Manohar Bhosale Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवणाऱ्या मनोहर भोसलेला अटक

  2. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल

  3. मोबाईल वापरू दिल्याप्रकरणी पोलीस नाईक बाळासाहेब दाढे निलंबित

Solapur Crime News : राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच सोलापूरमधल्या मनोहर भोसले या भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला. स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगणाऱ्या या भोंदूबाबावर फसवणूक आणि महिलांच्या अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या भोंदूबाबाला बोलण्यासाठी मोबाईल देण्याचे धाडस करणाऱ्या पोलीस नाईकवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी धडक कारवाई केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून त्याचे नाव बाळासाहेब दाढे असं आहे.

स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसले या भोंदूबाबावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मनोहर मामा भोसले याच्यावर करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर भोंदुगिरी आणि आर्थिक फसवणूक प्रकरणात बारामती व दौंड पोलीस ठाण्यांतही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातही त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना पुणे येथून अटक करून रात्री कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात आणले. या वेळी त्याला बोलण्यासाठी बाळासाहेब दाढे याने आपला मोबाईल दिल्याचे समोर आले आहे. तर विशाल वाघमारे बोलत असतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

Manohar Bhosale
Manohar Bhosale : पोलिसांनी ताब्यात घेताच मनोहर भोसलेचा बीपी वाढला; रिपोर्ट नॉर्मल येताच पुन्हा ठाण्यात रवानगी, घोटी आश्रमाबाहेर मोठा बंदोबस्त

एकीकडे आरोपी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे सर्व फोन काढून घेण्यात आले होते. तर दुसरीकडे त्यांना स्वतःचा मोबाईल उपलब्ध करून देण्याचे धाडस पोलीस ठाण्यातीलच कर्मचारी दाखवत असल्याचे आता उघड झाले आहे. असेच धाडस पोलीस नाईक बाळासाहेब दाढे याने केले आहे. यावरून गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पोलीस नाईक दाढे याला निलंबित केले आहे. तसेच त्याला सोलापूर मुख्यालयात दैनंदिन हजेरी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भोंदूगिरी आणि जादूटोणाविरोधात पोलीस प्रशासन अतिशय गोपनीयता बाळगत कठोर कारवाई करत असतानाच संबंधित पोलिसाने आरोपींना अशा पद्धतीची मदत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलीस अधीक्षकांनी तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. आता दाढेच्या फोनवरून मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला होता याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या निलंबनानंतर आरोपीला मदत करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

Manohar Bhosale
Manohar Bhosale : व्यावसायिक भरभराटीसाठी पूजा करावी लागेल असे सांगून फसविणाऱ्या मनोहर भोसलेला पोलिस कोठडी

FAQs :

1. मनोहर भोसले कोण आहेत
स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगणारे कथित भोंदूबाबा आहेत

2. त्यांच्यावर कोणते आरोप आहेत
फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत

3. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली
मनोहर भोसले यांना अटक करण्यात आली आहे

4. पोलीस नाईकावर का कारवाई झाली
भोंदूबाबाला मोबाईल वापरण्यास दिल्याचा आरोप आहे

5. निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव काय आहे
त्यांचे नाव बाळासाहेब दाढे आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com