Kedgaon double murder case : केडगाव दंगलप्रकरणी मोठा निकाल! अनिल राठोडांसह 600 शिवसैनिक निर्दोष; 2018चे खळबळजनक प्रकरण

Eight years after Kedgaon double murder unrest case, court acquits all 600 accused including late Shiv Sena Anil Rathod due lack evidence : अहिल्यानगरच्या केडगावमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्येनंतर उसळलेल्या संतापानंतर दाखल झालेल्या दंगलीच्या गुन्ह्याचा निकाल समोर आला आहे.
Kedgaon double murder case
Kedgaon double murder caseSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Kedgaon case : अहिल्यानगरच्या केडगावमध्ये 2018 मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर उसळलेल्या दगडफेक आणि रस्ता रोको प्रकरणी अखेर मोठा न्यायालयीन निकाल लागला आहे.

शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह तब्बल 600 शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुरावे सादर करण्यात पोलिसांना अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिल्याची माहिती समोर आली आहे.

एप्रिल 2018 मध्ये केडगाव परिसरात शिवसेनेचे (Shivsena) उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

या घटनेनंतर दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना (Police) शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणि मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपांवरून कोतवाली पोलिस ठाण्यात मोठा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kedgaon double murder case
Pathardi Gangrape Case : पाथर्डीत गँगरेप, पीडितेचं थेट पोलिस ठाण्यासमोर टोकाचं पाऊल; गोंधळात साथीदाराचा मृत्यू, 16 जणांवर अखेर गुन्हा

या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी भादंवि कलम 308 अर्थात ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ हे गंभीर कलम लावले होते. मात्र पुढील तपासादरम्यान हे कलम वगळण्यात आले आणि इतर वाढीव कलमांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

Kedgaon double murder case
Prajakt Tanpure : अहिल्यानगर विधान परिषदेत राजकीय ट्विस्ट? महायुतीकडून प्राजक्त तनपुरेंचं नाव चर्चेत; फडणवीसांच्या ‘गुड बुक’चा फायदा?

त्या काळात आमदार अनिल राठोड यांनी पोलिस कारवाईवर जोरदार आक्षेप घेतला होता.केडगावमधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून, हत्येनंतर निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणातून आणि नातेवाईकांच्या आक्रोशातून गोंधळ उडाला होता. शिवसेनेचा या प्रकाराशी थेट संबंध नसताना खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, 2020 मध्ये कोरोनाच्या काळात अनिल राठोड यांचे निधन झाले. त्यानंतरही न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर आठ वर्षानंतर आता या खटल्याचा निकाल लागला असून सर्व आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com