OBC Mayor : भाजप-राष्ट्रवादीची सत्ता, पण शांतता नाही! ‘मूळ ओबीसी vs कुणबी’ने महापौरपदावर रण पेटलं

BJP Abhay Agarkar Demands OBC Candidate for Ahilyanagar Mayor Post : अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदी मूळ ओबीसी उमेदवाराला संधी देण्यावरून, वाद पेटण्याची शक्यता आहे.
BJP Abhay Agarkar
BJP Abhay Agarkar Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Mayor Election : अहिल्यानगर महापालिकेतील महापौर पदाचं आरक्षण महिला ओबीसीला जाहीर झालं आहे. पण महापौर पदावर 'मूळ ओबीसी' बसणार की, 'कुणबी' यावरून वाद पेटू लागला आहे.

भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे युतीचाच महापौर होईल, हे चित्र स्पष्ट असतानाच, महापौर पदावर 'मूळ ओबीसी' की, 'कुणबी'? या जाती-पातीवरून वाद पेटताना दिसतो आहे. यातच भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी, यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे अभय आगरकर म्हणाले, "अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप (BJP) आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. युतीला जवळपास 52 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युतीचाच महापौर होईल हे स्पष्ट आहे. परंतु युतीत सर्वाधिक जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या, असल्यामुळे त्यांचाच महापौर होईल, असे दिसते आहे."

BJP Abhay Agarkar
PM Modi watch price : मोदींच्या मनगटावर चमकतंय 'हे' स्वदेशी घड्याळ; किंमत आणि ब्रँड ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

'अहिल्यानगर शहर मतदार संघ हा 'ओबीसी'चा (OBC) मतदार संघ म्हणून ओळखला जातो. ओबीसीसाठी जर महापौरपदाचा आरक्षण पडला असेल, तर 'मूळ ओबीसी' उमेदवाराला महापौर पदावर संधी मिळाली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. भाजपचा जुना जेष्ठ कार्यकर्ता म्हणून महापौर पदावरील संधीचा तोडगा हा सामंजस्याने निघाला पाहिजे. यामध्ये 'मूळ ओबीसी'ला प्रामाणिकपणे संधी दिली पाहिजे, असं माझं मत आहे,' असे अभय आगरकर यांनी म्हटले.

BJP Abhay Agarkar
Mayor No Confidence Motion : महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणायचा आहे, तर हे नियम जाणून घ्या...

अहिल्यानगर महापालिकेच्या दहाव्या महापौरपदी ओबीसी महिला बसणार आहे. याशिवाय, यंदाची सत्ता मनपात सर्वाधिक जागा जिंकणारा राष्ट्रवादी पक्ष घेतो की भाजपला देतो, हाही कळीचा मुद्दा आहे. मात्र, या महिलांपैकी असलेल्या 'मूळ ओबीसी' महिलेला संधी दिली जाते की, 'कुणबी' प्रमाणपत्र असलेल्या महिलेची या पदावर वर्णी लागते याची उत्सुकता आहे. यातच भाजपचे स्थानिक नेते अभय आगरकर यांनी, महापौर पदावर 'मूळ ओबीसी'ला संधी मिळावी, अशी मागणी केल्यानं चर्चांना अधिकच तोंड फुटलं आहे.

युतीतील प्रमुखांकडून महापौर पदाचे दावे

दरम्यान, भाजपचे माजी खासदार सुजय विखे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत युतीचे नेतृत्व केलं. परंतु, युतीतून दोन्ही बाजूकडील प्रमुखांनी आमचाच महापौर बसेल, असा दावा केला आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडीवर दोघा नेतृत्वांचे परस्परविरोधी मतं आल्याने, आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण महापौरपदी कोण बसणार? याची उत्सुकता लागली आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडतीनंतर, निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अहिल्यानगर महापौर महापालिकेच्या निवडणूक 31 जानेवारीला होणार आहे. यासाठी 30 जानेवारी, महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी अर्ज दाखल करता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com