Shiv Sena ward changes Ahilyanagar : भाजपने गोडी-गोडीत वचपा काढला? प्रभाग रचनेत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा गेम केला

Ahilyanagar Municipal Corporation Ward Restructuring Setback for Eknath Shinde Shiv Sena : अहिल्यानगर महापालिका प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्याची वेळ असून, या प्रभाग रचनेत सत्ताधारी भाजपचं वर्चस्व दिसत आहे.
Shiv Sena ward changes Ahilyanagar
Shiv Sena ward changes AhilyanagarSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Corporation ward restructuring : अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेवर सत्ताधारी भाजप महायुतीचा पगडा सर्वाधिक दिसतो. पण महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र चांगला धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या प्रभागांची मोडतोड झाली असून, त्यांना नव्यानं प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अशा या प्रभाग रचनेच्या तक्रारी थेट शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, माजी महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे या प्रमुखांच्या प्रभागांना धक्का बसला आहे. या माजी नगरसेवकांच्या प्रभागांची तीन ते चार ठिकाणी विभागणी केल्याने त्यांच्यावर प्रभागात मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान असणार आहे.

नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) माजी नगरसेवकांवर नव्याने प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. तसंच नवीन प्रभागांची व्याप्ती मोठी असल्याने काहींचे राजकीय अस्तित्वही धोक्यात आले आहे. प्रभाग रचनेत प्रामुख्याने मध्य शहरात मोठ्या प्रमाणात प्रभागांमध्ये फेरबदल झाले आहेत.

Shiv Sena ward changes Ahilyanagar
Maratha protesters cases withdrawal : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं शक्य आहे का? एकूण किती गुन्हे दाखल आहेत?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांचे माळीवाडा, नालेगाव परिसरात मोठे प्राबल्य आहे. तिथंच प्रभाग रचनेत मोठ्या उलथा-पालथी झाल्या आहेत. यामुळे राजकीय अस्तित्त्वाच्या अडचणीचा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसमोर निर्माण झाला आहे.

Shiv Sena ward changes Ahilyanagar
Pradhan Mantri Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेणे सोपे, असा कराल अर्ज

सावेडी उपनगरातील तारकपूर, सिव्हिल हडको परिसर वगळता उर्वरित प्रभागात माजी नगरसेवक आणि इच्छुकांसाठी सोयीस्कर रचना झाल्याचे पाहायला मिळते. यामुळे या भागातील सर्वच पक्षांच्या विशेषतः भाजप अन् राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून उमेदवारी जाहीर करण्याची स्पर्धा सुरू आहे. अनेकांनी पॅनेलसाठी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या प्रभाग रचनेवर शहरप्रमुख सचिन जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. "प्रभागाची रचना करताना महामार्ग, नदी विचारत न घेता ते ओलांडून काही प्रभाग तयार केली आहे. प्रभाग रचनेसाठी दिलेल्या निर्देशानुसार ही रचना झालेली नाही. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने, तसेच इच्छुक नगरसेवकांमार्फत प्रारूप प्रभाग रचनेवर नियमानुसार हरकती नोंदवण्यात येणार आहेत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com