Sujay Vikhe Vs Nilesh Lanke
Sujay Vikhe Vs Nilesh LankeSarkarnama

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : 'काहीही वर घे, पण लोक तुम्हाला...'; साधा 500 मीटरचा पुल होईना, विखेंनी लंकेंना डिवचलं!

Ahilyanagar Municipal Election: BJP Sujay Vikhe Criticises Sharad Pawar NCP MP Nilesh Lanke : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने खासदारी नीलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या राजकीय युद्ध पेटलं आहे.
Published on

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच धुरळा उडू लागला आहे. सत्ताधारी भाजप-अजित पवार राष्ट्रवादी युतीकडून विरोधक महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या दडपशाही, दहशतीवरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

खासदार नीलेश लंके स्वतः मैदानात उतरत, 'सत्ताधारी युतीला आपण बाह्या करून मैदानात उभं आहे,' असा इशारा दिला आहे. यावर माजी खासदार सुजय विखे यांनी, 'काहीही वर घे, पण लोक तुम्हाला खालीच आणणार', असं सुनावलं आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप (BJP) -अजित पवार राष्ट्रवादी युती आहे. शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदे शिवसेनेला युतीत घेणार नसल्याचा निरोप दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणुकीला समोरे जात आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळाकाहेब ठाकरे सेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष निवडणुकीला समोरे जात आहे.

महाविकास आघाडीचे नेतृत्व खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) करत आहे, तर भाजप-अजित पवार राष्ट्रवादीच्या युतीचे नेतृत्व भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप करत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेपेक्षा, भाजप-अजित पवार राष्ट्रवादी युती आणि महाविकास आघाडीत सामना रंगला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भाजप-अजित पवार राष्ट्रवादीकडून युतीकडून दहशत, दडपशाही सुरू असल्याचा आरोप आहे. तशा पोलिस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या आहेत.

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke
Imran Pratapgarhi AIMIM criticism : 'AIMIM'मुळे मुस्लिमांचे नेतृत्व कमजोर; इम्रान प्रतापगढी यांनी ओवैसींच्या 'पंतग'चा 'मांजा' कोणाचा, सांगून टाकलं!

खासदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या सभेत आमच्या एकाही उमेदवारावर दडपशाही किंवा दहशत केल्यास, गाठ माझ्याशी आहे. मी बाह्या वर करून स्वतः समोर येईल, असा इशारा दिला. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खासदार लंकेंच्या या इशाऱ्याची एका सभेत खिल्ली उडवली आहे.

Sujay Vikhe Vs Nilesh Lanke
Nilesh Lanke criticism : लंकेंचा तोफखाना धडाडला; विखेंसह जगतापांना सूचक इशारा, महापौर देखील सांगून टाकला...

साधा पूल होत नाही...

सुजय विखे पाटील म्हणाले, "आज तुम्ही ज्या माणसाला निवडून दिलं आहे, त्यांनी गेल्या दीड वर्षात काय काम केलं हे कालच्या सभेत 40 मिनिटांच्या भाषणात सांगू शकला नाही. दोन वर्षांपूर्वी सीना नदीचा पूल आपण मंजूर केला होता. मी खासदार झालो नाही, तर तो पूल दोन वर्षापासून तसाच लटकून आहे. अरे एक वर्षांमध्ये फ्लाय ओव्हर ब्रिज तयार करून दाखवला सुजय विखेने! यांना साधा 500 मीटरचा पूल होत नाही."

काहीही वर घे!

"हे भाषणामध्ये सांगतायत आम्ही बाह्या वर करू उभं आहोत. काहीही वर घे! पण लोक तुम्हाला खालीच आणणार हे स्पष्टपणे सांगतो. राजकारणात काही होऊ शकत एक लाट आणि त्यात ही लोक निवडून आली. लोकसभेचा चॅनल जेव्हा लोक पाहतात, तेव्हा लोकांच्या मनामध्ये हीच भावना येते की, आपण काय चूक केली," असा टोला देखील सुजय विखे पाटलांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com